एक्स्प्लोर

चीन अंतराळात पाठवणार चक्क माकडे!  काय आहे ड्रॅगनची योजना? 

China : शून्य-गुरुत्वाकर्षण वातावरणात माकडे कशी वाढतात आणि पुनरुत्पादन कसे करतात याचा अभ्यास करण्यासाठी चीन माकडांना तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवर पाठवण्याची योजना आखत आहे.

मुंबई : चीन (China) माकडांना (Monkeys) अंतराळात (Space  ) पाठवण्याची योजना आखत आहे. शून्य-गुरुत्वाकर्षण वातावरणात माकडे कशी वाढतात आणि पुनरुत्पादन कसे करतात याचा अभ्यास करण्यासाठी चीन माकडांना  तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवर पाठवण्याची योजना आखत आहे. अंतराळातील वैज्ञानिक संशोधनाचे नेतृत्व करणारे चिनी शास्त्रज्ञ झांग लू यांचा हवाला देत चीनमधील काही माध्यमांनी याबाबतची माहिती दिली आहे. माकडांना तेथे पाठवण्याचे आणि त्यांचे प्रजनन पाहण्याचे प्रयोग स्पेस स्टेशनच्या सर्वात मोठ्या मॉड्यूलमध्ये केले जातील, जे प्रामुख्याने स्पेस स्टेशनसाठी वापरले जाते, असे झांग लून यांनी म्हटले आहे. 
 
"मासे आणि गोगलगाय यांसारख्या लहान जीवांचा अभ्यास केल्यानंतर "उंदीर आणि  माकड यांचा समावेश असलेले काही अभ्यास आता ते अवकाशात कसे वाढतात किंवा पुनरुत्पादन करतात हे पाहण्यासाठी केले जातील. हे प्रयोग सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि इतर अवकाश वातावरणात जीवांचे अनुकूलन समजून घेण्यास मदत करतील, असा विश्वास झांग लून यांनी व्यक्त केला. 
 
एका अहवालानुसार, तज्ञांनी निदर्शनास आणून दिले की उंदीर आणि माकडांसारख्या जटिल जीवांवर असे अभ्यास करण्यात अजूनही अनेक अडचणी आहेत. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत संशोधकांनी भौतिक आव्हानांवर मात करण्यासाठी 18 दिवसांच्या अंतराळ उड्डाणात उंदीर पाठवले होते. ते अंतराळात कसे सोबत करू शकतात हे याचा अभ्यास त्यावेळी करण्यात येणार होता.  त्यात ते यशस्वी झाले होते. परंतु संभोगानंतर उंदरांमध्ये गर्भधारणेची कोणतीही चिन्हे नव्हती.  
 
अभ्यासाच्या काळात माकडांना खायला घालण्यात आणि त्यांचा कचरा हाताळण्यात येणाऱ्या अडचणींकडे संशोधक लक्ष वेधत आहेत. त्याच वेळी, असेही सांगितले जात आहे की, माकडांना देखील अंतराळ स्थानकात त्यांच्या बंदिस्तांमध्ये  आरामदायी पद्धतीने ठेवावे, कारण याचा लैंगिक वर्तनावर परिणाम होऊ शकतो. तियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर सध्या दोन पुरुष आणि एक महिला अंतराळवीर आहेत, अशी माहिती झांग लून यांनी दिली.  

झांग यांनी सांगितले की, "मोठे प्राणी, विशेषत: माकडे आणि मानव यांच्यात अधिक शारीरिक समानता आहेत. त्यामुळे अधिकाधिक देश चंद्र किंवा मंगळाच्या कक्षेत अधिक वेळ घालवण्याची योजना आखत असल्याने हे प्रयोग आवश्यक ठरतील. "

महत्वाच्या बातम्या

Russia-Ukraine War : पुतीन यांच्या भीतीने ज्यो बायडेन नरमले? रशियाला चर्चेस तयार असल्याचे सांगा; युद्धात होरपळलेल्या युक्रेनच्या नेत्यांना अमेरिकेचा खासगीत सल्ला! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full PC : तुम्हाला उज्ज्वल निकम देता आले नाहीत, जरांगे यांचा सरकारला खोचक सवालDevendra Fadnavis : PA आणि OSD संदर्भात 125 नावं आली, 109 नावं क्लिअर केल, फडणवीसांचं वक्तव्यJayant Patil And Chandrashekhar Bawankule Meet:जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट, भेटीत नेमकं काय ठरलं?Supriya Sule On Dhananjay Deshmukhअन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुळेंचा धनंजय देशमुखांना फोन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
Maharashtra Goverment:  महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा, भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा, भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
Embed widget