Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील युद्ध 40व्या दिवशीही सुरुच आहे. यादरम्यान रशियन सैनिकांनी केलेल्या नरसंहाराची वेगवेगळी दृश्य समोर येत आहेत. युक्रेनची राजधानी किव्हपासून सुमारे 37 किलोमीटरवर असणाऱ्या बुचा शहरामधील सॅटेलाईट आणि व्हायरल फोटोमधून भयावह परिस्थितीचं वास्तव समोर आलं आहे. जागाजागी मृतदेहांचा खच पडल्याचं दिसून येतंय. चर्चजवळ सुमारे 45 फुट लांब स्मशानभूमी दिसून आली आहे. एका खाजगी अमेरिकन कंपनीने रविवारी सांगितले आहे की, सॅटेलाइट फोटोंमध्ये बुचा शहरामध्ये चर्चजवळ 45 फुट लांब दिसून आली. रशियन सैन्य बुचा शहरातून मागे हटल्यानंतर तिथे स्मशानभूमी सापडली. शनिवारी बुचा शहराला भेट दिलेल्या रॉयटर्सच्या पत्रकारांनी राजधानी कीव्हच्या वायव्येस 37 किमी अंतरावर शहराच्या रस्त्यावर मृतदेहाचा खच आढळला. चर्चमध्ये एक सामूहिक कबर उघडी होती.


चर्चजवळ 45 फूट लांब स्मशानभूमी
युक्रेनने रविवारी रशियन सैन्यावर शहरात नरसंहार केल्याचा आरोप केला. युक्रेनने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने कीव्ह शहराच्या आसपासच्या भागांवर पुन्हा ताबा मिळवला आहे. युक्रेनचे सॅटेलाईट फोटो प्रकाशित करणार्‍या मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सांगितले की, चर्च ऑफ सेंट अँड्र्यू आणि पिरवोझव्हनोह ऑल सेंट्स येथे सामूहिक कबरीसाठी खोदकाम केल्याचं 10 मार्च पहिल्यांदा आढळलं होतं. मॅक्सोरने सांगितलं की, 31 मार्च रोजी बुचाच्या चर्चजवळील क्षेत्राच्या नैऋत्येला सुमारे 45 फूट लांब सामूहिक कबर आढळली. दरम्यान, रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या सॅटेलाईट फोटोंची पडताळणी केलेली नाही. मॅक्सरने प्रसारित केलेले सॅटेलाईट फोटो खरे आहेत की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.


बुचा येथे नरसंहाराचा आरोप रशियावर


दुसरीकडे, रशियाने नरसंहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. बुचा येथे रशियन सैन्याने नरसंहार केला असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. राजधानी कीव्हपासून 37 किमी अंतरावर असलेल्या बुचा शहरातून मृतदेहाचा खच पडल्याचे फोटो समोर येत आहेत. फोटोंमध्ये सर्वसामान्यांचे विकृत मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. दुसरीकडे पाश्चिमात्य देशांनीही या अस्वस्थ करणाऱ्या फोटोंवर जोरदार टीका केली आहे. जर्मनीसह इतर अनेक देशांनी रशियावरील निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha