Sri Lanka Cabinet Ministers Resign : श्रीलंकेत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेतील सर्व कॅबिनेट 26 मंत्र्यांनी रविवारी रात्री तत्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशाचे शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने म्हणाले की, कॅबिनेट मंत्र्यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केले आहेत. सामूहिक राजीनाम्या देण्याचे कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही.


दरम्यान, राजकीय तज्ज्ञांनी सांगितले की, परकीय चलन साठा कमी झाल्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकट निर्माण झालं. यावेळी सरकारच्या कथित चुकीच्या हाताळणीमुळे मंत्र्यांवर प्रचंड दबाव होता. कर्फ्यू लागू असूनही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. 


पंतप्रधानाच्या मुलानेही दिला मंत्रिपदाचा राजीनामा


श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे पुत्र नमल राजपक्षे यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आर्थिक संकटामुळे देशात जोरदार विरोध होत आहे. पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान राजपक्षे यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले. यानंतर काही तासांतच त्यांचा मुलाने मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नमल राजपक्षे श्रीलंकेतील युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री होते.




एक एप्रिलपासून आणीबाणी लागू
राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा श्रीलंकेत तत्काळ आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. सरकारने शनिवार संध्याकाळी सहा वाजेपासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 36 तासांता कर्फ्यूही लागू केला. कर्फ्यू काळात श्रीलंका सरकारने व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपवरही बंदी घातली होती. मात्र ही बंदी रविवारी उठवण्यात आली. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha