Pakistan PM : पाकिस्तानच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी आजपर्यंत 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. पाकिस्तानात कोणताही पंतप्रधान टिकू शकत नाही. पाकिस्तानात इम्रान खानही (Imran Khan) आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. तीन वर्षे 228 दिवसांत त्यांची पंतप्रधानांची खुर्ची गेली. आजपर्यंत पाकिस्तानच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केल्याचे घडलेले नाही. कधी कोणाला सभागृहात हरवले तर कुणाला लष्कराने हटवले.


आजपर्यंत पाकिस्तानमध्ये 30 पंतप्रधान
आजपर्यंत पाकिस्तानमध्ये 30 पंतप्रधान झाले आहेत, त्यापैकी 7 पंतप्रधान केअऱ टेकर होते. म्हणजेच एकूण 23 वेळा कोणाला ना कोणाला तरी पाकिस्तानने पंतप्रधानपदावर बसवले आहे. मात्र त्याची पाच वर्षे कोणालाही पूर्ण करता आलेली नाहीत. लष्कराचा राजकीय हस्तक्षेप हे त्याचे प्रमुख कारण आहे. जाणून घ्या कोणा-कोणाला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.


-14 ऑगस्ट 1947 रोजी लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनले. 4 वर्षे 63 दिवसांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.


-जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत. 3 वर्ष 325 दिवसांनंतर लष्कराच्या बंडखोरीच्या आरोपाखाली त्याला फाशी देण्यात आली.


-1988 मध्ये बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्या केवळ 1 वर्ष 247 दिवस पंतप्रधान राहिल्या. त्यानंतर बेनझीर यांचे सरकार 12 मतांनी पडले.


-नोव्हेंबर 1990 मध्ये त्यांच्या जागी पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते नवाझ शरीफ आले. मात्र राजकीय गोंधळामुळे ते 2 वर्षे 254 दिवस टिकले.


-ऑक्टोबर 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत बेनझीर भुट्टो पंतप्रधान झाल्या, पण यावेळी त्या तीन वर्षे 17 दिवस टिकू शकल्या. राष्ट्रपतींनी त्यांचे सरकार बरखास्त केले.


-फेब्रुवारी 1997 मध्ये नवाज शरीफ पूर्ण बहुमताने परतले. यावेळी त्यांचे सरकार केवळ 2 वर्षे 237 दिवस टिकले. लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांनी शरीफ यांची खुर्ची उलथवून टाकली.


-त्यानंतर जनरल मुशर्रफ यांनी पाकिस्तानात राज्य केले. मुशर्रफ यांच्या काळातही एकही पंतप्रधान टिकू शकला नाही. 


-मीर जफरुल्ला खान जमाली हे एक वर्ष 216 दिवस पंतप्रधान होते. चौधरी शुजात हुसेन 57 दिवस राहिले. शौकत अझीझ 3 वर्षे 79 दिवस पंतप्रधान राहिले.


-जेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या, तेव्हा युसूफ रझा गिलानी पंतप्रधान झाले, ज्यांच्या नावावर सर्वाधिक दिवस - 4 वर्षे 86 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. गिलानी यांनाही पाच वर्षे पूर्ण करता आली नाहीत.


-त्यांच्यानंतर आलेले राजा परवेझ अश्रफ हे केवळ 275 दिवस खुर्चीवर राहू शकले.


-नवाझ शरीफ 2013 मध्ये परतले. पण यावेळी पनामा पेपर्स लीकमध्ये गोष्टी अडकल्या आणि 4 वर्षे 53 दिवसांत त्यांची खुर्ची गेली.


-उर्वरित कालावधी सय्यद काखान अन्सारी यांनी पूर्ण केला. म्हणजेच गेल्या तीस वर्षांत पाकिस्तानने 12 पंतप्रधान पाहिले आहेत. पाकिस्तानातील या राजकीय अस्थिरतेचे कारण भ्रष्टाचार आणि राजकीय विरोध हे आहे. नेता पुढे गेला तर त्याला खाली खेचण्यात सेना नेहमीच पुढे असते. याच कारणामुळे पाकिस्तानात पंतप्रधान होणं कठीण ठरत आहे.


महत्वाच्या बातम्या


Pakistan Politics Crisis: पाकिस्तानमध्ये विरोधकांनी नॅशनल असेंब्लीवर केला कब्जा, निवडला नवीन पंतप्रधान


Pakistan No Trust Vote : पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळला!