Russia Ukarine War : युक्रेन-रशिया युद्धाच्या 40 दिवसांनंतरही कीव्हवर (Kyiv) ताबा मिळविण्याची लढाई सुरूच आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्ह काबीज करू शकले नाही, परंतु शहर सोडण्यापूर्वी त्यांनी कहर केला. युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने यांनी दावा केला आहे की, कीव्हमधून प्रदेशातून 410 मृतदेह सापडले आहेत.


 तब्बल 410 मृतदेह सापडले, राष्ट्राध्यक्षांचा नरसंहाराचा आरोप
संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी एक निवेदन जारी केले की, युक्रेनची राजधानी कीव जवळील बुचा शहरात मृत नागरिकांची छायाचित्रे पाहिल्यानंतर त्यांना "खूप धक्का" बसला आहे. त्यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. युक्रेनचे प्रॉसिक्युटर-जनरल म्हणाले की, कीव्हमधून 410 नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान बुचा येथे सामूहिक कबरी सापडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाकडून "युद्ध गुन्हे" बंद करण्याचे आवाहन केले आहे. 


झेलेन्स्की यांनी देशाला संबोधित केले


 झेलेन्स्की यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना सांगितले की, युक्रेनला माहीत आहे की, रशियाकडे युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात अधिक दबाव आणण्यासाठी सुरक्षा दल आहेत. ते म्हणाले, "रशियन सैन्याचे ध्येय काय आहे? त्यांना डॉनबास आणि युक्रेनचा दक्षिण काबीज करायचा आहे. आपले ध्येय काय आहे? स्वत:चे, तुमचे स्वातंत्र्य, तुमची जमीन आणि तुमच्या लोकांचे रक्षण करा." मारियुपोलच्या आसपास लक्षणीय संख्येने रशियन सैन्य तैनात होते, जेथे बचावकर्ते अथकपणे लढत आहेत. झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनच्या नागरिकांच्या धाडसामुळे आणि इतर शहरांच्या प्रतिकारामुळे, शत्रूचे डावपेच उधळून लावण्याची आणि त्यांची क्षमता कमी करण्याची संधी मिळाली," असे सांगत झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पाश्चिमात्य देशांना आवाहन केले. 


महत्वाच्या बातम्या


India Russia : LAC वर चीनने आगळीक केल्यास रशियाकडून भारताला मदत नाही; अमेरिकेचा दावा


Russia Ukraine War : रशियाचा मारियुपोलमध्ये युद्धविराम जाहीर, 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती