Russia Ukarine War :  40 दिवसांनंतरही  युक्रेन-रशिया युद्ध सुरूच आहे. या युद्धात शेकडो सैनिक आणि निर्दोष नागरिकांचा बळी गेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार एजंसीच्या माहितीनुसार आतापर्यंत युक्रेनमध्ये 1417 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 2038 लोकं जखमी झाली आहेत. यामध्ये मारियुपोल आणि इरपिन या भागातील आकडा नाही. या भागांमध्ये लाखो लोक अडकले असल्याची माहिती आहे. इथले आकडे समोर आल्यानंतर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


तब्बल 410 मृतदेह सापडले, राष्ट्राध्यक्षांचा नरसंहाराचा आरोप
संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी एक निवेदन जारी केले की, युक्रेनची राजधानी कीव जवळील बुचा शहरात मृत नागरिकांची छायाचित्रे पाहिल्यानंतर त्यांना "खूप धक्का" बसला आहे. त्यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. युक्रेनचे प्रॉसिक्युटर-जनरल म्हणाले की, कीव्हमधून 410 नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान बुचा येथे सामूहिक कबरी सापडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाकडून "युद्ध गुन्हे" बंद करण्याचे आवाहन केले आहे. 


झेलेन्स्की यांनी देशाला संबोधित केले


झेलेन्स्की यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना सांगितले की, युक्रेनला माहीत आहे की, रशियाकडे युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात अधिक दबाव आणण्यासाठी सुरक्षा दल आहेत. ते म्हणाले, "रशियन सैन्याचे ध्येय काय आहे? त्यांना डॉनबास आणि युक्रेनचा दक्षिण काबीज करायचा आहे. आपले ध्येय काय आहे? स्वत:चे, तुमचे स्वातंत्र्य, तुमची जमीन आणि तुमच्या लोकांचे रक्षण करा." मारियुपोलच्या आसपास लक्षणीय संख्येने रशियन सैन्य तैनात होते, जेथे बचावकर्ते अथकपणे लढत आहेत. झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनच्या नागरिकांच्या धाडसामुळे आणि इतर शहरांच्या प्रतिकारामुळे, शत्रूचे डावपेच उधळून लावण्याची आणि त्यांची क्षमता कमी करण्याची संधी मिळाली," असे सांगत झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पाश्चिमात्य देशांना आवाहन केले. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 





 


महत्वाच्या बातम्या


India Russia : LAC वर चीनने आगळीक केल्यास रशियाकडून भारताला मदत नाही; अमेरिकेचा दावा


Russia Ukraine War : रशियाचा मारियुपोलमध्ये युद्धविराम जाहीर, 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती