एक्स्प्लोर
रशियाचं बेपत्ता लष्करी विमान कोसळलं, 92 प्रवाशांचा मृत्यू
![रशियाचं बेपत्ता लष्करी विमान कोसळलं, 92 प्रवाशांचा मृत्यू Russias Missed Fighter Jet Crashed In Black Sea 92 Killed Including Crew Members रशियाचं बेपत्ता लष्करी विमान कोसळलं, 92 प्रवाशांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/25110741/fighter-plane-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोची : रशियाचं बेपत्ता लष्करी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 92 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
रशियातील ब्लॅक सीमध्ये हे विमान कोसळलं. रडारवरुन उड्डाण घेताच केवळ 20 मिनिटात हे विमान बेपत्ता झालं होतं. शोधमोहिमेनंतर समुद्रात या विमानाचे अवशेष आढळून आले. एका वृत्तसंस्थेने रशियन संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं होतं. आता मृत प्रवाशांचा समुद्रात शोध घेतला जात आहे.
स्थानिक रिपोर्ट्सनुसार विमानात 82 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर होते. प्राथमिक माहितीनुसार हे लष्करी विमान दक्षिण रशियातील सोची येथून सीरियातील लटाकीया प्रांतात जात होतं.
दरम्यान विमान दुर्घटनेतील जिवितहानीबाबत अद्याप कसलीही माहिती मिळू शकलेली नाही. Tu-154 हे विमान रशियाच्या समुद्राच्या हद्दीतूनच बेपत्ता झालं होतं.
सीरियातील रशियन ट्रूपवर नवीन वर्षाच्या सेलिब्रिशनसाठी या विमानातून काही कलाकार नेले जात होते. यामध्ये काही पत्रकारांचाही समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)