एक्स्प्लोर
रशियात 71 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
रशियाचे एक विमान राजधानी मॉस्कोतून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो विमानतळावरुन या विमानाने उड्डाण घेतले होते. या विमानात क्रू मेंबरसह एकूण 71 प्रवासी प्रवास करत होते.
मॉस्को : रशियाचे एक विमान राजधानी मॉस्कोतून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो विमानतळावरुन या विमानाने उड्डाण घेतले होते. या विमानात क्रू मेंबरसह एकूण 71 प्रवासी प्रवास करत होते.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या विमानाने मॉस्कोच्या विमानतळावरुन यूराल डोंगररांगेतील दक्षिणेत असलेल्या ओर्स्क शहरात जाण्यासाठी उड्डाण घेतले. पण काही क्षणातच ते रडारवरुन गायब झाले. यानंतर ते रामेंस्की जिल्ह्यात क्रॅश झाल्याची माहिती मिळाली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघातात इतका भीषण होता की, एक आगीचा गोळा प्रचंड वेगाने जमिनीवर येत असल्याचे दिसत होते. त्यामुळे या दुर्घटनेत क्रू मेंबर्ससह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एंतोनोव-148 नावाचं हे विमान सारातोव एअरलाईन्सचे हे विमान असून, याची निर्मिती सात वर्षांपूर्वी केली होती. विशेष म्हणजे, एका वर्षापूर्वीच सारातोव एअरलाईंसने एका दुसऱ्या रशियन एअरलाईन्सकडून ते खरेदी केले होते.
या अपघातापाठीमागे हवामानाची स्थिती आणि मानवी चूक असल्याची शक्यता परिवहन मंत्रालयाने व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर सारातोव एअरलाईंन्सची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement