Russian Oil Chief Death : रशियात आणखी एकाचा संशयास्पद मृत्यू? तेल कंपनीच्या प्रमुखाचा खिडकीतून पडून मृत्यू
Ravil Maganov Died : रशियातील दुसऱ्या क्रमांकाची तेल उत्पादक कंपनी ल्युकोइलचे अध्यक्ष रावेल मॅगानोव्ह यांचा हॉस्पिटलच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला आहे.
![Russian Oil Chief Death : रशियात आणखी एकाचा संशयास्पद मृत्यू? तेल कंपनीच्या प्रमुखाचा खिडकीतून पडून मृत्यू russian oil chief maganov dies in fall from hospital window Russian Oil Chief Death : रशियात आणखी एकाचा संशयास्पद मृत्यू? तेल कंपनीच्या प्रमुखाचा खिडकीतून पडून मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/b7f5e610667973d2c80aaac00cfa902a1662088526529322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ravil Maganov Death : रशियन (Russia) तेल कंपनीचे (Oil Company) प्रमुख रावेल मॅगनोव्ह (Ravil Maganov) यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. रशियातील दुसऱ्या क्रमांकाची तेल उत्पादक कंपनी ल्युकोइलचे (Lukoil) अध्यक्ष रावेल मॅगनोव्ह (Ravil Maganov) यांचा हॉस्पिटलच्या खिडकीतून पडून मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मॅगनोव्ह यांच्यावर मॉस्को (Moscow) येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मॅगनोव्ह यांचं वयाच्या 67 वर्षी निधन झालं आहे. रशियन मीडिया रिपोर्टनुसार, मॅगनोव्ह यांच्यावर मॉस्को सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते आणि त्यांचा दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे.
रशियातील दुसऱ्या क्रमांकाची तेल उत्पादक कंपनी ल्युकोइलचे (Lukoil) प्रमुख रावेल मॅगनोव्ह (Ravil Maganov) हे एक हायप्रोफाईल व्यक्तिमत्व होते, त्यांचा अशा रहस्यमय प्रकारे मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या मॅगानोव्ह यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासमध्येच निष्पन्न होईल की, त्यांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला. तास वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, रावेल मॅगानोव्ह यांचा मृत्यू रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून पडून झाला आहे. याशिवाय मॅगानोव्ह यांनी आत्महत्या केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
कोण होते रानेल मॅगनोव्ह?
रावेल मॅगनोव्ह (Ravil Maganov) हे रशियन तेल उत्पादक कंपनी ल्युकोइलचे (Lukoil) प्रमुख होते. मॅगानोवह् हे ल्युकोइल कंपनीच्या संस्थापकांपैकी एक होते. मॅगनोव्ह यांनी 1993 मध्ये ल्युकोइलसाठी काम करण्यास सुरुवात केली. कंपनीची स्थापना झाल्यानंतर लगेचच तेल शुद्धीकरण, उत्पादन आणि अन्वेषणाची जबाबदारी सांभाळली. मॅगनोव्ह 2020 मध्ये ल्युकोइल मंडळाचे प्रमुखे बनले. त्याचा भाऊ नील हा रशियन तेल उत्पादक टॅटनेफ्टचा प्रमुख आहे. ल्युकोइल बोर्डाने रशियन युक्रेन युद्धाबाबत या दुर्घटनेबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती आणि युद्ध लवकरात लवकर संपवण्याचं आवाहनही केलं होतं.
लुकोइल कंपनीनं काय म्हटलं?
लुकोइल कंपनीनं गुरुवारी प्रकाशित केलेल्या निवेदनात रावेल मॅगनोव्ह (Ravil Maganov) यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की, 'रविल मॅगानोव्ह यांचं गंभीर आजारामुळे निधन झालं आहे. मॅगानोव्ह यांनी केवळ कंपनीच्याच नव्हे तर संपूर्ण रशियन तेल आणि वायू क्षेत्राच्या विकासात खूप योगदान दिलं आहे.' दरम्यान कंपनीनं मॅनगोव्ह यांचा मृत्यू खिडकीतून पडून झाला आहे का याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)