(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या 103 मुलांचा मृत्यू, राजधानी कीव्हमध्ये लॉकडाऊन
Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या 103 मुलांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या वाढत्या हल्ल्यामुळे राजधानी कीव्हमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
Russia Ukraine War : गेल्या 21 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाडून दिवसेंदिवस युक्रेनवरील हल्ले तीव्र होत आहेत. रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनधील 103 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर शंभरपेक्षा जास्त मुले जखमी झाली आहेत, असा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान रशियाकडून सतत होत असलेल्या हल्यांमुळे कीव्हमध्ये 24 तासांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
युक्रेनमधील इरिना वेनेडिक्टोव्हा यांनी रशियाच्या हल्ल्यात 103 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती फेसबुकवरून दिली आहे. याबरोबरच "युक्रेनच्या रस्त्यावर अजूनही रशियन सैन्य दिसत आहे, असे इरिना यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे की, "युक्रेनकडे अशी शस्त्रे असू शकत नाहीत, ज्यामुळे रशियाला धोका निर्माण होईल. शिवाय दोन्ही देशांमध्ये चर्चा होणे कठीण आहे. युक्रेनच्या तटस्थ स्थितीचाही गांभीर्याने विचार केला जात आहे."
रशिया आणि युक्रेमध्ये आतापर्यंत चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, दोन्ही देशांमधील संघर्षावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अशातच पोलंड, झेक रिपल्बिक आणि स्लोव्हेनिया या तीन देशांचे पंतप्रधान युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पोहोचले आहेत. या तिन्ही देशांचे पंतप्रधान कीव्हमध्ये असतानाच जवळपासच्या भागांवर रशियन सैन्याकडून बॉम्ब हल्ले केले जात आहेत.
तिन्ही देशांचे पंतप्रधान जवळपास तीन तास कीव्हमध्ये होते. या संदर्भात पोलंडचे पंतप्रधान मॅट्युझ मोराविकी यांनी आपल्या फेसबुकवरून माहिती दिली आहे. " सध्या मी, चेक गणराज्य आणि स्लोव्हेनिया देशाच्या पंतप्रधानांसोबत कीव्हमध्ये असून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळेच जगाने सुरक्षिततेची भावना गमावली आहे. युद्धात अनेक निष्पाप लोक मारले जात आहेत. या पस्थितीला रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. याच अनुषंगाने आम्ही कीव्हमध्ये आलो आहोत, असे मॅट्युझ मोराविकी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिका आणि त्यांचे सहयोगी देश रशियावर सतत निर्बंध लादत आहेत. याशिवाय रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा करून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचवेळी नोटामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय युक्रेनने घेतला आहे. युक्रेनच्या या निर्णयानंतर रशियाकडून नरमाईची भूमिका घेतली जाईल अशी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine : रशिया-युक्रेन युद्ध; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन करणार मोठी घोषणा
- Russia Ukraine War: युक्रेनमधील युद्धामुळे दर मिनिटाला एक मूल होत आहे निर्वासित, 14 लाख मुलांनी इतर देशांमध्ये घेतला आश्रय
- Russia Ukraine War : युक्रेनमधून तीन भारतीयांची सुटका; पहिल्यांदाच रशियन सैन्याने केली मदत