Russia Ukraine Conflict : अमेरिकेचा रशियाला मोठा झटका, इंटेलकडून मायक्रोचिपचा पुरवठा बंद
Russia Ukraine Conflict : अमेरिकेकडून रशियाला मोठा झटका बसला आहे. अमेरिकन कंपनी इंटेलने रशियाला होणारा मायक्रोचिप पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्द सुरुच आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे. रशिया-युक्रेन संघर्षामध्ये अनेक देशांनीही आपली भूमिका मांडली आहे. अशात आता अमेरिकेकडून रशियाला मोठा झटका बसला आहे. अमेरिकन कंपनी इंटेलने रशियाला होणारा मायक्रोचिप पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटेल ही संगणकासाठी प्रोसेसर बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे.
इंटेल कंपनीने रशियन उत्पादकांना मायक्रोचिपच्या पुरवठ्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हा निर्णय रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला प्रतिसाद म्हणून घेतला आहेत. त्यामुळे इंटेलने आधीच पुरवठा थांबवला आहे. चीनमधील भागीदारांना इंटेलच्या स्थानिक कार्यालयाने रशियाला प्रोसेसरच्या पुरवठ्यावरील बंदीबद्दल माहिती दिली आहे. या बंदीमुळे दीर्घकाळात रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो कारण कंपन्या क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा स्टोरेजसाठी सर्व्हरचा वापर अपग्रेड, बदलू किंवा वाढवू शकणार नाहीत.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता धोकादायक वळणावर आहे. या युद्धाकडे जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. या युद्धात तोफ, गोळे, बंदुकांनी सुरु असलेली ही लढत अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या युद्धात बेलारूसची रशियाला खूप मदत मिळत आहे. अशा स्थितीत फ्रान्सने या प्रकरणात हस्तक्षेप करत युक्रेनविरुद्धच्या युद्धात बेलारूसने रशियाला मदत करू नये, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : बॉम्बस्फोट आणि तोफांच्या आवाजातच चिमुकलीचा जन्म, युक्रेन सरकारनं नाव ठेवलं 'स्वातंत्र्य'
- Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेले 250 विद्यार्थी दिल्ली विमानतळावर पोहोचले, एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha