(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia-Ukraine Tension : रशियानं उचललेल्या पावलामुळं वाढला युद्धाचा धोका; युक्रेनकडून चिंता व्यक्त
Russia-Ukraine Tension : रशिया आणि बेलारूस यांनी 10 दिवसांचा संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. युक्रेन म्हणते की ते 'मानसिक दबाव' आणत आहेत.
Russia-Ukraine Tension : युक्रेनवर (Ukraine) रशियाच्या आक्रमणाच्या भीतीनं रशिया (Russia) आणि बेलारूसने (Belarus) 10 दिवसांचा संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. बेलारूस आणि रशियामध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. तसेच बेलारूसची युक्रेनला जोडून मोठी सीमा आहे.
बेलारूसमधील रशियन सैन्याची असलेली मोठ्या प्रमाणावरील तैनाती ही शीतयुद्धानंतरची 'हिंसक इशारा' असल्याचं फ्रान्सनं म्हटलं आहे. तसेच, युक्रेनचं म्हणणं आहे की, हा 'मानसिक दबाव' आहे.
ब्रिटनचे (UK) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी गुरुवारी सांगितलं की, युरोप दशकातील सर्वात मोठ्या सुरक्षा संकटाचा सामना करत आहे. सीमेवर 100,000 हून अधिक सैन्य जमा करूनही रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्याची कोणतीही योजना वारंवार नाकारली आहे.
सीमेवर 100,000 हून अधिक सैन्य जमा करूनही रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची कोणतीही योजना वारंवार नाकारली आहे. पण अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी कधीही हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला आहे.
युक्रेन-बेलारूस सीमेजवळ सराव सुरू
लष्करी सराव - अलाईड रिझॉल्यूशन 2022 (Allied Resolve 2022) - युक्रेनच्या बेलारूस सीमेजवळ होत आहे. जो 1,000 किमी (620 मैल) लांब आहे.
जर रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर सर्वात आधी लक्ष युक्रेनची राजधानी किव (Kyiv) शहराला केलं जाईल. कारण या संयुक्त लष्करी सरावात रशियानं आपलं सैन्य किवच्या अगदी जवळ ठेवलं आहे.
बेलारूसचे नेते अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे कट्टर मित्र आहेत आणि दोन्ही देशांनी एक तथाकथित 'संघीय राज्य' तयार केलं आहे. ज्यामध्ये आर्थिक आणि लष्करी एकीकरण समाविष्ट आहे. 2020 मध्ये झालेल्या वादग्रस्त निवडणुकीनंतर क्रेमलिनने (Kremlin) लुकाशेन्कोला पाठिंबा दिला, ज्यामुळे बेलारूसमध्ये निदर्शने झाली.
यूएस म्हणते की, सुमारे 30,000 रशियन सैन्य बेलारूससह सरावात सहभागी होण्याची अपेक्षा आहे, जरी मॉस्को आणि मिन्स्कने (Minsk) सहभागींची अचूक संख्या उघड केलेली नाही.
सरावानंतर सैनिक परतल्याचा रशियाचा दावा
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "संरक्षणात्मक ऑपरेशनसह बाह्य आक्रमणापासून दूर राहणे" हा सराव करण्याचा मुख्य हेतू होता. सैनिक सीमेचे रक्षण करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा वितरण वाहिन्या रोखण्यासाठी देखील सराव करतील.
करारानुसार, आपलं सैन्य आपल्या आणि मित्र राष्ट्रांच्या हद्दीत मुक्तपणे हलवण्याचा अधिकार असल्याचा रशिया आग्रही आहे. सरावानंतर सैन्य बेलारूसमधील त्यांच्या तळांवर परत जातील, असे रशियाने म्हटले आहे.
दुसरीकडे युक्रेन आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी या लष्करी सरावावर चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितले, "सीमेवर सैन्य जमा करणे हा आपल्या शेजाऱ्यांकडून मानसिक दबाव आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- डोनाल्ड ट्रम्प किम जोंगच्या अजूनही संपर्कात! जोंगला लिहिलेल्या पत्रांसह कागदपत्रांचे 15 बॉक्स हस्तगत
- America Taiwan Missiles Deal : चीनला धक्का! अमेरिकेकडून तैवानसोबत 100 कोटी डॉलर्सच्या क्षेपणास्त्र कराराला मंजुरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha