डोनाल्ड ट्रम्प किम जोंगच्या अजूनही संपर्कात! जोंगला लिहिलेल्या पत्रांसह कागदपत्रांचे 15 बॉक्स हस्तगत
राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताना कागदपत्रांनी भरलेले 15 बॉक्स आपल्या सोबत घेऊन गेले. या कागदपत्रांमध्ये किम जोंग उन यांच्यासोबत झालेला पत्रव्यवहार देखील होता.
![डोनाल्ड ट्रम्प किम जोंगच्या अजूनही संपर्कात! जोंगला लिहिलेल्या पत्रांसह कागदपत्रांचे 15 बॉक्स हस्तगत US News donald Trump says he is still in touch with North Korea’s Kim Jong Un डोनाल्ड ट्रम्प किम जोंगच्या अजूनही संपर्कात! जोंगला लिहिलेल्या पत्रांसह कागदपत्रांचे 15 बॉक्स हस्तगत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/11/74a77e2033fda5bb1e5d1d49746b2892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
US News: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नव्या वादात सापडले आहेत. व्हाईट हाऊस सोडल्यापासून उत्तर कोरियाचा हुकुमशाह नेता किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याशी संपर्कात आहेत. उत्तर कोरियाच्या अलीकडील क्षेपणास्त्र चाचण्यांवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकार मॅगी हॅबरमन यांनी लिहिलेल्या "द कॉन्फिडन्स मॅन" या पुस्तकात ही माहिती दिली असून त्यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील संबंधांबद्दल मला माहिती होतं. ट्रम्प यांनी 2018 मध्ये दोघांमधील पत्रांची देवाणघेवाण केली होती. त्यावेळी किम जोंगसोबत ट्रम्प यांनी तीन बैठका करत त्यांना अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे न सोडण्याबाबत विनंती केली.
ट्रम्प यांच्या दाव्यांची पुष्टी केली जाऊ शकत नाही आणि ते खोटेही असू शकतात, असं हेबरमन यांनी म्हटलं आहे. ते काय बोलतात आणि प्रत्यक्षात काय घडते याबाबत निश्चित नसते. परंतु ते लोकांना सांगत असतात की त्यांनी किम जोंग उनशी एक प्रकारचा पत्रव्यवहार किंवा चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की तो एकमेव परदेशी नेता आहे जो किम जोंग यांच्याशी तो संपर्कात आहे, असं हेबरमन यांनी सांगितलं आहे.
ट्रम्प आपल्यासोबत 15 बॉक्स घेऊन गेले
द वॉशिंगटन पोस्टनं म्हटले आहे की, नॅशनल अर्काइव्हनं सांगितलंय की, राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताना कागदपत्रांनी भरलेले 15 बॉक्स आपल्या सोबत नेले. ही कागदपत्रं फ्लोरिडामधील मार-ए-लागो रिसॉर्टमधून हस्तगत केली गेली. या कागदपत्रांमध्ये किम जोंग उन यांच्यासोबत झालेला पत्रव्यवहार देखील होता.
यूएस स्टेट डिपार्टमेंटने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे तर ट्रम्प यांच्या प्रतिनिधीने देखील यावर बोलण्यास नकार दिला आहे. 1799 लोगान कायदा खाजगी यूएस नागरिकांना अधिकृततेशिवाय परदेशी सरकारांशी वाटाघाटी करण्यापासून प्रतिबंधित करणारा कायदा आहे. असं असताना देखील ट्रम्प यांनी उन यांच्याशी संवाद साधल्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टनमधील उत्तर कोरिया प्रकल्प 38 चे संचालक जेनी टाउन यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प अतिशयोक्ती करण्यासाठी ओळखले जात होते. त्यांनी पाठवलेले कोणतेही संदेश केवळ शुभेच्छा असू शकतात. परंतु जर यात सत्यता असेल तर व्हाईट हाऊसशी समन्वय किंवा सल्लामसलत न करता अशा गोष्टी करणं अडचणीत आणणारं आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने वारंवार उत्तर कोरियाशी संवाद साधण्याबाबत आवाहन केले आहे पण त्याला किम यांच्याकडून नकार दिला गेला आहे. बायडन यांनी किम जोंगला "ठग" असं संबोधलं होतं.
ट्रम्प यांनी महत्वाची कागदपत्रं फाडायचे, 15 बॉक्स सोबत घेऊन गेले
पुस्तकात सांगितलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी राष्ट्रपती पदावर असताना अधिकारीक कागदपत्रं फाडायचे आणि फ्लॅश करायचे. ट्रम्प यांनी इतकी कागदपत्रं फ्लॅश केली होती की त्यामुळं व्हाइट हाऊसचं टॉयलेट जॅम झालं होतं. ट्रम्प यांनी राष्ट्रपती असताना अनेकदा प्रोटोकॉल्सचं उल्लंघन केलं होतं. मात्र कागदपत्रांचा मुद्दा हा प्रेसिडेंशियल रेकॉर्डशी संबंधित नॅशनल अर्काइव्हशी जोडलेला आहे. नॅशनल अर्काइव्हची मागणी आहे की माजी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या कागद फाडण्याच्या सवयीची चौकशी व्हायला हवी. ट्रम्प यांच्यावर ऑफिशियल डॉक्यूमेंट्स फ्लोरिडाला पाठवले असल्याचा देखील आरोप आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)