Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या महिनाभराहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील इंधन डेपोवर क्षेपणास्त्र हल्ला केला. आता रशियन सैन्याने पश्चिम युक्रेनियन शहर ल्विव्ह आणि कीव्ह बाहेरील इंधन डेपोवर हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी युक्रेनियन सैन्याच्या इंधन पुरवठ्याला लक्ष्य केल्याचे सांगितले आहे.


रशियन सैन्याने ल्विव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात सुमारे पाच जण जखमी झाले. रशियन बॉम्बस्फोटानंतर ल्विव्हचे महापौर आंद्रे सडोवी म्हणाले की, हा हल्ला शनिवारी शेजारच्या पोलंडमध्ये असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी इशारा होता. रशियन संरक्षण मंत्रालयाने ल्विव्हमधील लक्ष्यावर क्षेपणास्त्र हल्ल्याची पुष्टी केली आहे.


ल्विव्ह शहराजवळ एक मोठा इंधन तळ नष्ट
रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी रविवारी सांगितले, 'रॉकेटने ल्विव्ह शहराजवळील एक मोठा इंधन तळ नष्ट केला आहे. हा इंधन तळ युक्रेनच्या पश्चिम भागात आणि कीव्ह जवळील युक्रेनियन सैन्याला इंधन पुरवठा करत होता.' रशियन सैन्याने ल्विव्ह शहरावर वेगळा हल्ला केल्याचीही पुष्टी केली. हल्ल्यात क्रूझ क्षेपणास्त्राने ल्विव्हच्या रेडिओ दुरुस्ती प्रकल्पाला लक्ष्य केले.


भीषण आग 14 तासांनंतर आटोक्यात
युक्रेनच्या संरक्षण विभागाने ल्विव्हमधील इंधन तळावर झालेल्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ल्विव्हमधील इंधन डेपोला लागलेली भीषण आग सकाळी 6:49 वाजता विझवण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 14 तास लागले, अशी माहिती ल्विव्हचे महापौर आंद्रे सडोवी यांनी ट्विट करत दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha