Imran khan: पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. रविवारी इस्लामाबाद येथे एका सभेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, मी पाच वर्षे पूर्ण करणार असून राजीनामा देणार नाही. सभेदरम्यान इम्रान खान म्हणाले की, मी जनतेच्या विकासासाठी राजकारणात आलो आहे.


इम्रान खान म्हणाले की, जेव्हा आपण (पाकिस्तानचे नागरिक) पाच वर्षे पूर्ण करू, तेव्हा संपूर्ण देशाला दिसेल की, इतिहासातील अन्य कोणत्याही सरकारने गरिबी कमी केली नव्हती, ती आपण करून दाखवली. ते म्हणाले की, मी 25 वर्षांपूर्वी राजकारणात फक्त एकाच गोष्टीसाठी आलो होतो आणि ती म्हणजे पाकिस्तानची निर्मिती ज्या दृष्टीकोनाने झाली, ते पुढे नेणे. ते म्हणाले की, जे काम आम्ही तीन वर्षात केले, ते काम यापूर्वी कोणी केले नव्हते.


याच दरम्यान, इमरान खान यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला असून त्यावर सोमवारी मतदान होणार आहे. 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय आंदोलन वाढले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पक्ष) देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला जबाबदार असल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे.


दरम्यान, इम्रान खान आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. इम्रान खानचे मित्रपक्ष त्यांच्यापासून दुरावले आहेत. तर त्यांच्या पक्षाचे सुमारे 24 हुन अधिक खासदार त्यांच्या विरोधात बंड करत आहेत. 69 वर्षीय इम्रान खान यांच्या पक्षाचे 342 सदस्य असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये 155 सदस्य आहेत. तर सरकारमध्ये राहण्यासाठी त्यांना किमान 172 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या