Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष अद्याप सुरुच आहे. युद्धात एकीकडे युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांच्या शौर्याने संपूर्ण जगाची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे युक्रेनमधील परिस्थितीमुळे लाखो युक्रेनियन दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले आहेत. यावेळी असे काही लोक आहेत जे बेकायदा संपत्ती घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनच्या हंगेरीच्या सीमेवर असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे युक्रेनच्या माजी खासदाराच्या पत्नीला सुटकेसमध्ये कोट्यवधी रुपये अवैध पद्धतीने नेताना सैनिकांनी पकडले आहे.


सुटकेसमध्ये लाखो डॉलर्स आणि युरो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी काही दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये डॉलर आणि युरो घेऊन जात होती. युक्रेनच्या माजी खासदाराच्या पत्नीचं नाव कोटवित्स्की आहे. कोटवित्स्की पैसे घेऊन देश सोडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र हंगेरीच्या सीमेवरील सुरक्षा जवानांनी तिला अडवले. सैनिकांनी संशयावरून तिच्या सुटकेसची झडती घेतली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सूटकेसमध्ये सुमारे 28 दशलक्ष डॉलर्स आणि 1.3 दशलक्ष युरो रोख होते. ती झाकरपट्टिया प्रांतातून हंगेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.


लाखो लोक देश सोडण्यास देण्यास भाग पडले


एकीकडे कोटवित्स्की कोट्यवधी रुपये घेऊन देश सोडून पळून जात असताना पकडले गेली. दुसरीकडे लाखो लोकांना त्यांचं सर्वस्व सोडून स्थलांतरील व्हावं लागत आहे. सुमारे तीन लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. नागरिक जीव वाचवण्यासाठी सर्वकाही सोडून जायला तयार झाले आहेत.


रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरुच
रशियन सैन्याने गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ल्यांद्वारे सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. सर्वसामान्यांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये दहशतीचे वातावरण असून लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha