Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ना युक्रेन झुकायला तयार आहे ना रशिया. या युद्धामुळे सैनिकांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला आहे. अशात आता जर्मनी युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला आहे. जर्मन प्रेस एजन्सीच्या मते, 25 मार्च रोजी 1500 'स्ट्रेला' विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि 100 MG3 मशीन गनची खेपजर्मनीतून युक्रेनमध्ये पोहोचली आहे.


रशिया कीव्हवरील हल्ल्याचा पुनर्विचार करतंय - अमेरिकन अधिकारी
युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाचे लष्करी हल्ले थांबले असून रशिया युक्रेनच्या इतर भागांमध्ये होणाऱ्या हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा अंदाज अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने वर्तवला आहे. या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर शुक्रवारी माहिती दिली की, रशिया किमान काही काळासाठी कीव्ह काबीज करण्याऐवजी युक्रेनचा पूर्व डोनबास प्रदेश ताब्यात ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसत आहे.


रशियन जनरल स्टाफचे डेप्युटी चीफ कर्नल जनरल सर्गेई रुडस्कोई यांनी सांगितले की, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील रशियाचे मुख्य उद्दिष्ट युक्रेनची लढाऊ क्षमता कमी करणे, हे प्रामुख्याने साध्य झाले आहे, त्यानंतर रशियन सैन्याने डोनबास प्रांतावर लक्ष केंद्रित केले आहे. डोनबास हे युक्रेनचे पूर्वेकडील औद्योगिक शहर आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने रशियन भाषिक लोक राहतात. रशिया समर्थित फुटीरतावादी 2014 पासून डोनबासमध्ये युक्रेनियन सैन्याशी लढत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha