ISRO New Launch Pad : इस्रो (ISRO) लवकरच चांद्रयान-3 लाँच करणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, चांद्रयान-3 चे काम वेगाने सुरू आहे. डॉ. के. सिवन यांनी सांगितले की, भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. यावेळी आम्हाला आमच्या मिशनमध्ये नक्कीच यश मिळेल, असेही ते म्हणाले. सिवन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चांद्रयान-3 मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल.


तामिळनाडूमध्ये उभारले जाणार लॉन्च पॅड 
चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला तामिळनाडूमध्ये लाँच पॅड बांधले जाणार आहे. डॉ. के. सिवन यांनी सांगितले की, 'केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने आम्हाला कुलशेखरपट्टणममध्ये भूसंपादनासाठी मंजुरी दिली याचा आम्हांला खूप आनंद आहे. आम्ही लवकरच तेथे देशाचे दुसरे प्रक्षेपण पॅड तयार करू शकू आणि इस्रो लवकरच चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबाबत माहिती देईल.'


'कोरोनाने खूप काही शिकवले'
डॉ. सिवन यांनी कोरोनामुळे होणाऱ्या परिणामावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, 'आमच्या सर्व प्रकल्पांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे, परंतु या काळात इस्रोने आपल्या रणनीतीवर काम केले, जेणेकरून आम्ही कठीण परिस्थितीतही चांगले व्यवस्थापन करू शकू. महामारीने आम्हांला रॉकेट लाँच करण्याचा एक नवीन मार्ग दिला, जो प्रत्येक मिशनमध्ये लागू केला जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha