रशियाने 'या' क्षेपणास्त्राची केली चाचणी; पुतिन म्हणाले: शत्रूंना दोनदा विचार करायला लावेल
Russia-Ukraine War: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने बुधवारी नवीन 'सरमत इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
Russia-Ukraine War: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने बुधवारी नवीन 'सरमत इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. अशी माहिती स्वतः रशियाने माध्यमांना दिली आहे. याबाबत बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाला धमकावण्याचा प्रयत्न करणार्यांना हे क्षेपणास्त्र दोनदा विचार करण्यास भाग पाडेल.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पुतिन यांना लष्कराने टीव्हीवर या क्षेपणास्त्राची चाचणी दाखवली होती. हे क्षेपणास्त्र वायव्येकडील प्लेसेत्स्क येथून प्रक्षेपित करण्यात आले आणि आणि ते सुदूर पूर्वेकडील कामचटका या द्वीपकल्पातील लक्ष्यावर आदळले. युक्रेनच्या पूर्वेकडील औद्योगिक क्षेत्रातील कोळसा खाणी आणि कारखान्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हल्ले तीव्र केले असतानाच रशियाने ही क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. रशियाने युक्रेनचे अनेक शहरे आणि गावांजवळ शेकडो मैल लांब असलेल्या क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. पूर्वेकडील डॉनबास प्रदेश ताब्यात घेणे हे रशियन सैन्याचे मुख्य लक्ष्य आहे.
पूर्व युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यांमुळे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस चिंतेत
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही पूर्व युक्रेनमध्ये रशियाच्या मोठ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मंगळवारी सांगितले की, पूर्व युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्याने युद्ध अपरिहार्यपणे अधिक हिंसक, रक्तरंजित आणि विनाशकारी बनले आहे. गुटेरेस यांनी गुरुवारपासून सुरू होणार्या चार दिवसांच्या इस्टर आठवड्यात आणि 24 एप्रिल रोजी इस्टर संडेपर्यंत युद्ध मानवतेच्या आधारावर थांबवण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सायकलस्वाराला ओव्हरटेक करणं लॅण्ड रोव्हर चालकाला महागात, 99 हजार रुपयांचा दंड
मोठी बातमी: श्रीलंका सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार; एक ठार, अनेक जखमी
पाकिस्तानचा अफगाणिस्तानावर 'Air Strike', 47 जण ठार, मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश