एक्स्प्लोर
पाकचे ख्यातनाम कव्वाल अमजद साबरींची हत्या
इस्लामाबाद: पाकिस्तानचे लोकप्रिय कव्वाली गायक अमजद साबरी यांची हत्या झाली आहे. कराचीमध्ये साबरी यांच्या गाडीवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या थरारामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
या गोळीबारात साबरी यांना तब्बल सहा गोळ्या लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कराचीमधील लियाकतबादेत ही घटना घडली. हल्लेखोराच्या गोळीबारात काही नागरीकही जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
गोळी लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साबरी यांना अब्बासी शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement