एक्स्प्लोर
मुस्लिम धर्मगुरुंसह कंदिलचा सेल्फी, पाकमध्ये खळबळ
मुंबई : विराट कोहलीसाठी जीव टाकणाऱ्या पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोचचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी कंदिलने ट्विटर, फेसबुकवर स्वतःच शेअर केला आहे.
कंदिल आणि मौलवी यांचा फोटो लगेच व्हायरल झाला, त्यानंतर पाकिस्तानी मीडियात खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर दोघांचा व्हिडिओही तिने शेअर केला. रमजानच्या काळात कंदिल आणि कवी एका इफ्तार पार्टीनिमित्त हॉटेलात भेटले होते. त्यावेळी धर्मगुरुंची टोपी घालून कंदिलने दोघांचा सेल्फी घेतला.
'मुफ्ती यांनी एका हॉटेलात माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. भेटल्यावर त्यांनी प्रेमाची कबुली दिली.' असं कंदिलने मीडियाला सांगितलं आहे.
मुफ्ती अब्दुल कवी यांनी मात्र कंदिलचा दावा फेटाळून लावला आहे. तिलाच माझी भेट घ्यायची होती आणि तिने माझ्याकडे दुआ मागितल्या, असं मौलवींनी म्हटलं आहे. माजी क्रिकेटपटू आणि नेते इमरान खान यांची भेट घालून देण्याची गळ कंदिलने घातल्याचंही मुफ्तींनी स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement