एक्स्प्लोर
नऊवारी नेसून शीतल महाजनांचं 13 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग
महाराष्ट्राची शान असलेल्या पद्मश्री शीतल महाजन यांना मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे.
![नऊवारी नेसून शीतल महाजनांचं 13 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग Pune’s Sheetal Mahajan did sky diving from 13 thousand feet wearing Nine yard saree in Bangkok latest update नऊवारी नेसून शीतल महाजनांचं 13 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/12123401/Sheetal-Mahajan-Sky-Diving-Nauvari-Saree-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बँकॉक : स्काय डायव्हिंग करणाऱ्या अनेक धाडसी व्यक्तींचे व्हिडीओ आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र नऊवारी साडी नेऊन तब्बल 13 हजार फुटांवरुन एका महिलेने उडी मारली. पुण्याच्या शीतल महाजन यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली.
थायलंडमधील स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये 13 हजार फुटांवरुन नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग केलं.
शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये आजवर 17 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रमही रचले आहेत.
महाराष्ट्राची शान असलेल्या पद्मश्री शीतल महाजन यांना मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे. मराठी संस्कृतीचं जतन व्हावं आणि मराठी बाणा कायम रहावा यासाठी त्यांनी ही अनोखी कामगिरी केली.
पाहा फोटो : नऊवारी नेसून 3 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग
महाराष्ट्राची संस्कृती असलेला नऊवारी साडीचा पेहराव करुन पहिल्यांदाच त्यांनी विमानातून जम्प केली. जगामध्ये आजवर कोणीच साडी नेसून स्काय डायव्हिंग करण्याचा धाडसी प्रयत्न केला नसल्याचं त्या म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)