Protest Against Pakistan in Pakistan Occupied Kashmir : बलुचिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तानविरोधात एल्गार; हजारो नागरिक रस्त्यावर उतरले
आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा असंतोष उफाळून आला आहे. हजारो नागरिक पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

protest against Pakistan in Pakistan occupied Kashmir : पाकिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची सैन्यांवर अत्यंत क्रूर पद्धतीने बलोच बंडखोरांकडून हल्ले सुरू आहेत. कधी रेल्वे हायजॅक, तर कधी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला अशा पद्धतीने बलूच लिबरेशन आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये अनेक सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. ही भयावह स्थिती असतानाच आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा असंतोष उफाळून आला आहे. हजारो नागरिक पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अत्यंत कमालीचे ताणले गेले आहेत.
Massive protest in Shigar valley, Baltistan against (the Mines and Minerals Act 2025) the illegally control of Gilgit Baltistan lands, mountains, and mineral resources.#GilgitBaltistan #ProtectOurResources pic.twitter.com/iUBWOxMBFI
— Naseem Shigri (@na_shigri) April 28, 2025
पाकिस्तान सरकारसमोर आव्हान
भारताने झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक प्रकारे पाकिस्तानला दणका देत सिंधू जलकरार रद्द केला आहे. भारतातील पाकिस्तानींना सुद्धा चले जावचा आदेश दिला आहे. व्हिसा सुद्धा रद्द केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तरात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये परिस्थिती तणावाची निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील मंत्र्यांकडून सुद्धा अत्यंत भडकावू वक्तव्य सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष उकळून आल्याने एक प्रकारे पाकिस्तान सरकारसमोर आव्हान निर्माण झालं आहे. भारताकडून सातत्याने पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये घ्यावे अशी मागणी केली जात आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे यापूर्वी झाले असून आता पाकिस्तानचे तीन तुकडे केल्याशिवाय पाकिस्तानची मस्ती कमी होणार नाही, असा सूर भारतातील संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भारताने कोणत्याही प्रकारची कारवाई करून बळकावलेला काश्मीर ताब्यात घ्यावा अशी मागणी देशभरामधून केली जात आहे.
People form across Gilgit Baltistan are coming together at Shigar in protest against the oppressive occupation of mountains, lands & minerals. The participants have vowed to sacrifice their lives & property to protect the interests of POGB.@wajahatgilgiti @ArfatKh101 @JavedBeigh pic.twitter.com/LWAoUYnwfw
— Aftaab Mughal (@AftaabMughal_) April 28, 2025
दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराच्या तिन्ही दलांकडून युद्धसराव सुरू आहे. इतकेच नव्हे तर सीमेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानकडून केले जात असल्याने तेथे सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. आतापर्यंत नऊ दहशतवाद्यांची घरे उडवून देण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर साडेचारशेच्या आसपास संशयित ताब्यात घेत मोठी मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या दोन दशकांमधील हे सर्वात मोठे कोबिंग ऑपरेशन आहे असल्याचे बोलले जात आहे.
Protest against the Mines and Minerals Act 2025 Gilgit Baltistan, people are chanting: "Seizure of our lands is unacceptable, takeover of our mountains is unacceptable, and control over our resources is unacceptable."#GilgitBaltistan #StandForJustice #ProtectOurResources pic.twitter.com/ihRR0jJNoq
— Naseem Shigri (@na_shigri) April 28, 2025
इतर महत्वाच्या बातम्या
























