एक्स्प्लोर
ब्रिटनच्या संसदेत पहिली शीख महिला खासदार
लंडन : ब्रिटनमधील सर्वसाधारण निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून ब्रिटनच्या संसदेत पहिल्या शीख महिला खासदाराची निवड झाली आहे. लेबर पार्टीच्या उमेदवार प्रीत कौर गिल यांनी विजय मिळवला.
प्रीत कौर गिल यांनी बर्मिंगहॅम एडबॅस्टनची जागा 24 हजार 124 मतं मिळवून जिंकली. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या उमेदवार कॅरलिन स्क्वायर यांचा गिल यांनी 6 हजार 917 मतांनी पराभव केला.
'ज्या मतदारसंघात माझा जन्म झाला, मी लहानाची मोठी झाले, त्याच भागाचं खासदारपद भूषवण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी झाले आहे. मेहनत आणि दृढनिश्चयाच्या बळावर मी कठीण गोष्टी साध्य करेन, असा विश्वास प्रीत कौर गिल यांनी विजयानंतर व्यक्त केला.
तन्मनजीत सिंग देसी यांनी 34 हजार 170 मतं मिळवत लेबर पक्षाचे पहिले पगडीधारी खासदार होण्याचा मान पटकवला आहे. लेबर पार्टीतर्फे 14 भारतीय वंशाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
भारतीय वंशाच्या प्रिती पटेल, अलोक शर्मा, शैलेश वरा, रिषी सुनाक, सुएला फर्नांडिस, किथ वाझ, वलेरी वाझ, लिसा नंदी, सीमा मल्होत्रा, वीरेंद्र शर्मा यांनी खिंड लढवली आहे. माजी महापौर नीरज पाटील यांचा मात्र यूकेच्या शिक्षणमंत्र्यांनी पराभव केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement