एक्स्प्लोर
जगातील 10 शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश
न्यूयॉर्क: फोर्ब्स मासिकाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील टॉप 10 शक्तीशाली व्यक्तीमध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत. या यादीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सलग चौथ्यांदा आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले असून, अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानी बाजी मारली आहे.
टॉप 10 च्या यादीत मोदी नवव्या स्थानी
फोर्ब्सने एकूण 74 जणांची यादी जाहीर केली असून, यामध्ये पंतप्रधान मोदी नवव्या स्थानी आहेत. 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात भारताचे पंतप्रधान अजूनही लोकप्रिय असल्याचे फोर्ब्सने म्हणले आहे.
कोण कितव्या स्थानी?
या यादीत जर्मनीचे चान्सलर एजेंला मर्केल तिसऱ्या स्थानी असून, चौथ्या स्थानी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आहेत. तर पोप फ्रांसिस पाचव्या स्थानी आहेत. याशिवाय अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे प्रमुख जेनेट येलेन यांना फोर्ब्सने आपल्या शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत सहभागी केले असून, त्यांनी सहावे स्थान पटकावले आहे. तसेच बिल गेटस सातव्या स्थानी आणि गूगलचे सह संस्थापक लॅरी पेज यांनी आठव्या स्थानी धडक मारली आहे.
अंबानी आणि सत्या नडेला यांचाही समावेश
या यादीत रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचाही समावेश झाला असून, ते 38 व्या स्थानी आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे भारतीयवंशाचे सीईओ सत्या नडेला हे 51 व्या स्थानी आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement