एक्स्प्लोर

बिश्केक SCO संमेलन | नरेंद्र मोदींचा इम्रान खान यांच्याकडे कानाडोळा

किर्गिजस्तानमध्ये सुरु असलेल्या शांघाई सहकार संघटन संमेलनात डिनरच्या वेळी नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांच्यासोबत ना त्यांनी हस्तांदोलन केलं, ना कुठली चर्चा केली.

नवी दिल्ली : किर्गिजस्तानच्या बिश्केकमधील परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बोलणं टाळलं. एससीओ परिषदेनंतर झालेल्या डिनरमध्ये सर्व देशांचे प्रमुख बसले असताना मोदी आणि इम्रान खान यांच्यातील दरी जाणवली. डिनरच्या वेळी नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांच्या बाजूला बसणंही टाळलं. इम्रान खान यांच्यासोबत ना त्यांनी हस्तांदोलन केलं, ना कुठली चर्चा केली. इतकंच काय, मोदींनी इम्रान खान यांच्याकडे साधं ढुंकूनही पाहिलं नाही. मोदींनी पाकिस्तानला दिलेली वागणूक इम्रान खान कायम लक्षात ठेवतील, अशीच होती. दरम्यान, एससीओ परिषदेआधी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यान चीनने पाकिस्तानसोबतच्या चर्चेचा मुद्दा समोर ठेवला, मात्र सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानसोबत कुठलीही चर्चा शक्य नसल्याचं मोदींनी ठणकावून सांगितलं. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. भारताने दबाव टाकल्यानंतर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात आलं. त्यामुळे पाकिस्तानसोबत चर्चेचा प्रश्नच येत नाही, असं मोदी म्हणाले. त्यानंतर मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. एससीओ परिषद काय आहे? एससीओ म्हणजेच शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात सहकार संघटन संमेलन. एससीओ ही राजकीय आणि सुरक्षा संघटना आहे. या संघटनेचं मुख्यालय चीनच्या बीजिंगमध्ये आहे. 2001 मध्ये ही संघटना निर्माण झाली. चीन, रशिया, कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान हे संघटनेचे सदस्य आहेत. भारत आणि पाकिस्तान 2017 पासून संघटनेचे सदस्य झाले आहेत. सदस्य देशांचे सैन्य, आर्थिक मदत, गुप्त माहितीची देवाणघेवाण, मध्य आशियातील दहशतवादाविरोधात मोहीम अशा मुद्द्यांवर चर्चा होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषणABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Embed widget