एक्स्प्लोर
Advertisement
नरेंद्र मोदी हे एक महान पंतप्रधान आहेत: डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (26 जून) रात्री 1 वाजता (भारतीय वेळेनुसार) व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीनं मोदींचं व्हाईट हाऊसबाहेर स्वागत केलं.
द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता अशा अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मोदींनी स्वागताबद्दल ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानले, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी महान असल्याचा उल्लेख केला.
व्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या या बैठकीत दहशतवाद या प्रमुख मुद्यावर एकमत झाले. दोन्ही देश एकत्र येउन दहशतवाद संपवू असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
'भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असून, दोन्ही देश मिळून आयसिसला संपवण्याचा प्रयत्न करु.' असेही ते म्हणाले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
ट्रम्प यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'राष्ट्रपती ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीनं माझं स्वागत केलं. मला दिलेला हा सन्मान हा भारतातील 125 कोटी देशवासियांचा सन्मान आहे.'
या भेटीनंतर ट्रम्प यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. 'मोदींचं स्वागत करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ते एक महान पंतप्रधान आहेत. त्यांचं काम खूपच शानदार आहे. ज्या पद्धतीनं ते आर्थिक पातळीवर काम करत आहेत त्यासाठी त्यांचा खरंच सन्मान व्हायला हवा.'
दरम्यान, मोदींनी ट्रम्प यांना भारतात सहपरिवार येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
संबंधित बातम्या:
अमेरिकेत सात मुस्लीमबहूल देशातील नागरिकांना 'नो एंट्री' कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement