Plane Landing : थरार! पायलट विमानातच झाला बेशुद्ध; प्रवाशानं सांभाळली प्लेनची धुरा अन् सेफ लँडिंग
Plane Landing : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 आसनी कारवाँ विमानाने उड्डाण केले. मात्र, काही अंतरावर टेक ऑफ केल्यानंतर अचानक पायलट बेशुद्ध पडला.
Safe Plane Landing : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 सीटर कारवाँ विमानाने उड्डाण केले. मात्र, काही अंतरावर टेक ऑफ केल्यानंतर अचानक पायलटची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. पायलट बेशुद्ध झाल्याची बातमी समजताच विमानात खळबळ उडाली. मात्र, एका प्रवाशाने समय सूचकता दाखवत तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. आणि तब्बल 70 मैल उड्डाण तर केलेच, पण विमानाचे सुरक्षित लँडिंगही केले. या दरम्यान प्रवासी आणि हवाई वाहतूक नियंत्रण यांच्यातील संभाषण वायरलेसवर रेकॉर्ड करण्यात आले. तेव्हा ही घटना समोर आली.
प्रवाशाने ATC च्या मदतीने विमान उड्डाण केले
यावर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या टीमने प्रवाशाला विमानाचे उड्डाण करण्या संदर्भात काही प्रश्न विचारले, ज्यावर प्रवाशाने आजपर्यंत एकही विमान उडवले नसल्याची माहिती दिली. यानंतर एटीसीने या प्रवाशाला विमानाचे स्टेअरिंग हाताळण्यास सांगितले. तसेच वारंवार आपण ज्या सूचना देऊ त्याचे पालन करण्यास सांगितले. प्रवाशाने एटीसीने दिलेल्या सूचनांचे अगदी काटेकोरपणे पालन केले. प्रवाशाने हे विमान तब्बल 70 मैल उडवले आणि सुरक्षित लॅंडींगही केले. अशा प्रकारे एटीसी आणि प्रवाशाच्या समजुतीमुळे विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप विमानाच्या खाली उतरवण्यात आले.
अमेरिकन विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. अशा घटना त्यांनी फक्त चित्रपटातच पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. ही घटना एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. तसेच, या विमानातील एका प्रवाशाने वेळीच समय सूचकता दाखवून विमान उडवले याबाबत लोक त्या प्रवाशाचं कौतुक तर करतच आहेत पण त्याचबरोबर त्यांना आश्चर्याचा धक्काही तितकाच बसला आहे.
महत्वाच्या बातम्या :