एक्स्प्लोर
बॉयफ्रेण्डसोबत पळून जाण्यासाठी पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप
गे डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यासाठी अमित पटेलने पत्नी जेसिकाचा काटा काढल्याचं समोर आलं आहे.
लंडन : इंग्लंडमधील भारतीय वंशाच्या विवाहितेच्या हत्येचं रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. बॉयफ्रेण्डसोबत पळून जाण्यासाठी समलिंगी तरुणानेच 34 वर्षीय पत्नीची हत्या केली होती. 37 वर्षीय मितेश पटेलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जेसिका पटेल यांचा मृतदेह इंग्लंडमधील राहत्या घरात मे महिन्यामध्ये आढळला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दरोडाखोरांनी पत्नीची हत्या केली, असा बनाव पतीने सुरुवातीपासून केला.
पती मितेशनेच जेसिका यांची गळा आवळून हत्या केल्याचं न्यायालयात निष्पन्न झालं होतं. गे डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यासाठी तरुणाने पत्नीचा काटा काढल्याचं समोर आलं आहे.
विशेष म्हणजे पत्नीच्या नावे काढलेला 20 लाख डॉलर्सचा विमा मिळवून बॉयफ्रेंड डॉ. अमित पटेलसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा आरोपी मितेशचा इरादा होता.
आरोपी मितेश पटेल आणि मयत पत्नी जेसिका
'पत्नीची हत्या कशी करावी?', 'इन्सुलिन ओव्हरडोस', 'किती प्रमाणात मिथेडॉन तुमचा जीव घेतं?', 'यूकेमध्ये काँट्रॅक्ट किलर' असे इंटरनेट सर्चही मितेशने केले होते. जुलै 2015 मध्येच 'तिचे दिवस भरले आहेत' असा मेसेज मितेशने अमितला केला होता. मितेशचे अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा केला जात आहे.
जेसिका यांच्या हत्येने तिचे कुटुंबीय पूर्णपणे हादरुन गेले आहेत. 'तिची स्वप्नं फार साधी होती. प्रेमात पडावं, स्वतःचं कुटुंब बनवावं आणि आनंदात आयुष्य घालवावं' अशा तिच्या फार माफक आकांक्षा होत्या, असं तिचे कुटुंबीय सांगतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement