एक्स्प्लोर
अमेरिकेत विमानतळावर पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवले
शाहीद खान अब्बासी यांची चक्क कपडे उतरवून तपासणी करण्यात आली.

वॉशिंग्टन: अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध तणावाचे झाले असतानाच, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची वॉशिंग्टनमधील जे.एफ.केनेडी विमानतळावर चांगलीच बेअब्रू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव शाहीद खाकान अब्बासी यांची चक्क कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. एखाद्या पंतप्रधानाला अशी वागणूक देण्याची जगातली ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे पाकिस्तानी जनता आणि नेत्यांनी अमेरिकेवर तोंडसुख घेतलंय. शाहीद खाकान अब्बासी यांची बहीण अमेरिकेत राहते. ती सध्या आजारी आहे. तिची विचारपूस करण्यासाठीच अब्बासी खासगी दौऱ्यावर होते. मात्र याच दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांचीही भेट घेतल्याचं समजतंय. डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानवर व्हिजा बॅन लावण्याच्या विचारात आहे. तसंच याआधीही अणूव्यवहाराच्या संशयावरुन पाकच्या 7 कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. त्यामुळे आता अब्बासी प्रकरण त्यावरची कडी असल्याचं दिसतंय. VIDEO:
आणखी वाचा























