एक्स्प्लोर

Shabana Mahmood: ब्रिटन सरकारमध्ये फेरबदल अन् पाकव्याप्त काश्मीरमध्ये आनंदाला उधाण! शबाना महमूद आहेत तरी कोण?

Shabana Mahmood: शबाना पाकिस्तानी वंशाच्या आहेत आणि 2010 पासून खासदार आहेत. त्या ब्रिटनच्या सर्वात ज्येष्ठ मुस्लिम महिला नेत्या मानल्या जातात. त्या पाकव्याप्त काश्मीरमधील पहिल्या मुस्लिम महिला आहेत.

Shabana Mahmood: ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. उपपंतप्रधान अँजेला रेनर यांच्या राजीनाम्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. रेनर यांच्यावर अपार्टमेंट खरेदी करण्यात आणि सुमारे 40 हजार पौंड स्टॅम्प ड्युटी वाचवून कर घोटाळा केल्याचा आरोप होता. या बदलातील सर्वात मोठी नियुक्ती शबाना महमूद यांची आहे, ज्यांना ब्रिटनचे नवीन गृहसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शबाना महमूद कोण आहेत? (Who is Shabana Mahmood)

शबाना पाकिस्तानी वंशाच्या आहेत आणि 2010 पासून खासदार आहेत. त्या ब्रिटनच्या सर्वात ज्येष्ठ मुस्लिम महिला नेत्या मानल्या जातात. ही जबाबदारी मिळालेल्या त्या पाकव्याप्त काश्मीरमधील पहिल्या मुस्लिम महिला आहेत. ब्रिटिश सरकारच्या वेबसाइटनुसार, शबाना महमूद 5 जुलै 2024 ते 5 सप्टेंबर 2025 पर्यंत लॉर्ड चान्सलर आणि न्यायमंत्री होत्या. 2024 मध्ये त्या बर्मिंगहॅम लेडीवुड सीटवरून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांचे कुटुंब पाकव्याप्त मिरपूर, काश्मीरचे आहे. शबाना यांचा जन्म 1980 मध्ये बर्मिंगहॅम येथे झाला. बालपणी काही वर्षे सौदी अरेबियात घालवली आणि नंतर पुन्हा युकेला येत मोठ्या झाल्या.

राजकारणात येण्यापूर्वी, शबाना बॅरिस्टर  

वडील सिव्हिल इंजिनिअर होते आणि नंतर स्थानिक लेबर पार्टीचे अध्यक्ष झाले. आईने कुटुंबाला किराणा दुकान चालवत मदत केली. किशोरावस्थेत शबाना यांनी वडिलांसोबत निवडणूक प्रचारात भाग घेतला. 2002 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आणि 2003 मध्ये 'इन्स ऑफ कोर्ट स्कूल ऑफ लॉ'मधून बॅरिस्टरचा अभ्यास केला. राजकारणात येण्यापूर्वी, शबाना बॅरिस्टर म्हणून काम करत होत्या आणि प्रोफेशनल इन्डेम्निटी कायद्यात तज्ज्ञ होती. 2010 मध्ये, त्या यास्मिन कुरेशी आणि रुशनारा अली यांच्यासोबत निवडून आल्या आणि ब्रिटनमधील पहिल्या मुस्लिम महिला खासदारांपैकी एक ठरल्या.

गृहमंत्री झाल्यानंतर, आता इमिग्रेशन, सीमा सुरक्षा, पोलिसिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी जबाबदार असेल. त्यांची नियुक्ती युकेमध्ये विविधता आणि अल्पसंख्याकांच्या वाढत्या शक्तीचे प्रतीक म्हणून वर्णन केली जात असताना, काही टीकाकार मूळ आणि राजकीय भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित करत आहेत.

सोशल मीडियावर वादविवाद

शबाना यांच्या नियुक्तीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोक याला अल्पसंख्याकांच्या वाढत्या राजकीय शक्तीचे लक्षण म्हणत आहेत, तर काहीजण त्यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणांबद्दल चिंतेत आहेत. काही लोक त्यांच्या मूळ आणि पॅलेस्टाईन समर्थक भूमिकेबद्दल टीका करत आहेत. शबाना महमूद यांना यूकेमध्ये मोठी जबाबदारी मिळाल्याने पाकिस्तानमधील लोक खूप आनंदी आहेत. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी कोणाला मिळाली?

शबाना आता बेकायदेशीर स्थलांतर, लहान बोटींद्वारे सीमा ओलांडणे आणि निर्वासित यासारख्या संवेदनशील समस्यांना सामोरे जातील. त्याच वेळी, परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांना उपपंतप्रधानपदी नेमण्यात आलं आहे. यवेट कूपर यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्टारमर सरकार सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. आर्थिक आश्वासनांची पूर्तताकरणे, सामाजिक योजनांवर यू-टर्न घेणे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यात अपयश. या परिस्थितीत, शबाना महमूद यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.

ब्रिटिश पत्रकार टॉमी रॉबिन्सन यांनी व्हिडिओ शेअर केला

ब्रिटिश पत्रकार टॉमी रॉबिन्सन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, "कुराणवर संसदीय शपथ घेतलेल्या शबाना महमूद आता पंतप्रधान स्टारमर यांच्या नवीन गृहसचिव बनल्या आहेत. आता त्या इमिग्रेशन आणि सीमांच्या प्रभारी असतील. या व्हिडिओमध्ये त्या म्हणत आहेत की इस्लाम त्यांच्यासाठी सर्वांपेक्षा वर आहे. लेबर पार्टीला काढून टाकणे आवश्यक आहे."

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
Embed widget