एक्स्प्लोर
पाकव्याप्त पंजाबमध्ये ऑईल टँकरचा स्फोट, शेकडो नागरिकांचा मृत्यू
दिल्ली : पाकिस्तानमध्ये ऑईल टँकरच्या आगीमुळे झालेल्या स्फोटात शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकव्याप्त पंजाबमध्ये आज रविवारी सकाळी बहावलपूर शहराजवळ हा अपघात झाला.
चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यानं टँकर पलटी झाला. पलटी झाल्यावर टँकरमधून वाहणारं तेल जमा करण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी टँकरजवळ गर्दी केली. मात्र अचानक टँकरला आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. या आगीत शेकडो लोकांचा होरपळून मृत्यू झाला.
या आगीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटात भाजलेल्या अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचं स्थानिक माध्यमांनी स्पष्ट केलं आहे. या आगीत 6 कार आणि 12 मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत. आगीत जळालेल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement