एक्स्प्लोर
बलुचिस्तानात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 59 प्रशिक्षणार्थींचा मृत्यू
क्वेट्टा: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. बलुचिस्तानमधील क्वेट्टाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला केला.
रात्री 12 वाजता येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तीन दहशतवादी घुसले, आणि त्यांनी अंधाधूद गोळीबार सुरु केला. यात जवळपास 59 जणांचा मृत्यू झाला. या आत्मघातकी हल्ल्यात 116 जण जखमी झाले आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांनी स्वत:ला बॉम्बने उडवून दिले, तर तिसरा दहशतवादी चकमकीत मारला गेला.
या हल्ल्यात दहशतवाद्यांनी जवळपास 700 पोलीस प्रशिक्षणार्थींना बंदी बनवलं होतं. मात्र, आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचा उद्देश क्वेट्टामधील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वस्तीगृहात घुसण्याचा होता. मात्र, वस्तीगृहाच्या सुरक्षारक्षकांनी बाहेरच आडवल्याने, दहशतवाद्यांनी अंधाधूंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यावेळी कॅम्पसमध्ये जवळपास 700 पोलीस प्रशिक्षणार्थी होते. या हल्ल्यानंतर तत्काळ पोलीस आणि सैन्याने ताबा घेऊन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, सोमवारी क्वेट्टाच्या दक्षिण भागातील सूरबमध्ये दोन सीमा शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांची हत्या केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement