दूध 150 रु, साखर 100 रु तर टॉमेटो 80 रुपये, पाकिस्तानात महागाई, चीनला फायदा!
Pakistan inflation : दैनंदिन जीवनातील पदार्थांच्या या किंमती भारत देशातल्या नाहीत. तर या सर्व किंमती सध्या पाकिस्तानात पाहायला मिळत आहेत.
Pakistan inflation : 1 लिटर दूध- 150 रुपये, 1 किलो चिकन- 340 रुपये, 1 किलो साखर- 100 रुपये, 1 किलो टॉमेटो- 80 रुपये, दैनंदिन जीवनातील पदार्थांच्या या किंमती भारत (india) देशातल्या नाहीत. तर या सर्व किंमती सध्या पाकिस्तानात (pakistan) पाहायला मिळत आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे अजब वक्तव्य
भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या सामान्य नागरिकांना अशा महागाईचा सामना करावा लागतोय. वाढत्या महागाईविरोधात तिथली सामान्य माणसं रस्त्यावर उतरत असल्याचं चित्र पाहायला मिळत हे. दरम्यान पाकिस्तानातील वाढत्या महागाईचे चित्र पाहता इथे मोर्चे देखील निघत आहेत. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मात्र अजबच वक्तव्य केलंय, ज्यावर सध्या संतापाची लाट पसरली आहे. बेरोजगारी, गरिबी आणि त्यात महागाई अशा परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानी जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आता त्यावर विरोधकही आपली पोळी भाजून घेताना दिसत आहेत. इम्रान खान यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार तयारी देखील केली आहे. इम्रान यांच्याविरुद्ध मांडलेल्या अविश्वास ठरावावर 22 मार्चला मतदान होऊन त्याचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
बटाटा-टोमॅटोचे भाव तपासण्यासाठी मी राजकारणात आलो नाही, तर...
पाकिस्तानातील (Paksitan) जनता वाढत्या महागाईने हैराण झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी संताप व्यक्त करत, 'बटाटा-टोमॅटोचे'चे भाव तपासण्यासाठी आपण राजकारणात आलो नाही. संसदेत अविश्वास प्रस्ताव आणल्याबद्दल विरोधी पक्षांवर निशाणा साधताना खान म्हणाले
दोन्ही देशांतील परिस्थितीचा फायदा चीनला
एकीकडे पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना दुसरीकडे श्रीलंकतेही पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली असल्याची माहिती मिळत आहे. आणि या देशांतील परिस्थितीचा फायदा मात्र चीन घेतोय. अडचणीत असलेल्या दोन्ही राष्ट्रांना मदत करुन पाकिस्तान आणि श्रीलंकेतलं आपलं वर्चस्व वाढवू पाहतोय. त्यामुळे पाकिस्तानमधील महागाईचे चटके भविष्यात आपल्याही सहन करावे लागण्याची शक्यता आहे.