Pakistan Defence Minister: पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांच्या तोंडातून सत्य बाहेर पडलं, दहशतवाद्यांना कोणाच्या सांगण्यावरुन मदत, म्हणाले....
Khawaja Asif : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यानी एक खळबळजनक दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीत त्यांनी अमेरिकेवर काही गंभीर आरोप केले आहेत.

Khawaja Asif on Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला उखडून टाकण्याचा इशारा दिलाय. सोबतच या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी रात्री सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (सीसीएस) बैठक बोलावली आणि भारताने पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये 65 वर्षे जुना सिंधू पाणी करार थांबविण्यात आला आहे. अटारी चेकपोस्ट बंद करण्यात आला आहे. व्हिसा निलंबित करण्यात आले आहेत आणि लष्करी उच्चायुक्तांना काढून टाकण्यात आले आहे. दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान सरकार 1972 मध्ये भारतासोबत झालेला शिमला करार रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे याच मुद्यावर बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री (Pakistan Defence Minister) ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यानी एक खळबळजनक दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीत त्यांनी अमेरिकेवर (America) काही गंभीर आरोप केले आहेत.
गेल्या 3 दशकांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत - ख्वाजा आसिफ
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना सवाल करत विचारले होते की, “तुम्ही हे कबूल करता का की, पाकिस्तानचा या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, त्यांना प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा दीर्घ इतिहास आहे?” यावर उत्तर देताना ख्वाजा आसिफ यांनी उत्तर देत सांगितले की “ आम्ही गेल्या 3 दशकांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत.” अशी कबुलीच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना कोणाच्या सांगण्यावरुन मदत होते हे आता स्वता: पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांच्या तोंडातून सत्य बाहेर पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे
Sky News (@SkyYaldaHakim): “But you do admit, you do admit sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations?”
— Drop Site (@DropSiteNews) April 24, 2025
Pakistan Def. Minister: “Well, we have been doing this dirty work for United States for 3… pic.twitter.com/sv5TRkCgCZ
काश्मीर हल्ल्याशी पाकिस्तानचा कुठलाही संबंध नाही- ख्वाजा आसिफ
तर दुसरीकडे, अल जझीरा या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काश्मीर हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध जोडण्याचे भारताचे आरोप फेटाळून लावले आहे. सोबतच या आरोंपावर बोलताना ही घटना भारताने व्यापलेल्या प्रदेशातील "स्वदेशी प्रतिकार" असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काश्मीरवरील संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा उल्लेख केला आणि मोदींच्या नेतृत्वाखालील मानवाधिकारांच्या उल्लंघनांवरून भारत लक्ष विचलित करत असल्याचा आरोप केलाय.
आसिफ यांनी भारताकडून सीमापार प्रत्युत्तराची शक्यता असल्याचा इशारा दिलाय. परंतु 2019 मध्ये भारतीय विमान पाडल्याचा संदर्भ देत पाकिस्तानची प्रत्युत्तर देण्याची तयारी ही दर्शविली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना हल्ल्याशी जोडण्याचे दावे निराधार असल्याचे फेटाळून लावले आहे. तर काश्मीरला पाकिस्तानची "गळाभिन्न नस" असल्याचा पुनरुच्चार केलाय. मुलाखतीचा शेवट पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट आठवण करू दिली की, काश्मीरचा वाद पाकिस्तानसाठी अस्तित्वात आहे. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा






















