एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना लवकरच बेड्या
जुलैमध्ये पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर्स लीक प्रकरणी नवाज शरीफ यांना शिक्षा सुनावली होती. त्यानतंर काही दिवसात नवाज शरीफ हे लंडनला गेले आणि तेव्हापासून ते तिथेच आहेत.
इस्लामाबाद : पंतप्रधान पदावरुन हटवल्यानंतरही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोरील अडचणी कमी झाल्या नाहीत. उलट शरीफ यांच्या अडचणींमध्ये वाढच होताना दिसते. शरीफ यांच्याविरोधात पाकमधील कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.
पनामा पेपर्स प्रकरणाशी संबंधित नवाज शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती शरीफ यांच्याच वकिलांनी दिली आहे.
नवाज शरीफ हे सध्या लंडनमध्ये पत्नीसोबत आहेत. त्यांची पत्नी कुलसुम नवाज कर्करोगाशी लढा देत आहेत. त्यांच्यावर खूप दिवसांपासून उपचार सुरु आहेत.
जुलैमध्ये पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर्स लीक प्रकरणी नवाज शरीफ यांना शिक्षा सुनावली होती. त्यानतंर काही दिवसात नवाज शरीफ हे लंडनला गेले आणि तेव्हापासून ते तिथेच आहेत.
28 जुलै रोजी पनामा पेपर्स प्रकरणात नवाज शरीफ यांना पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान पदावरुन हटवले. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.
पनामा पेपर्स काय आहे?
पनामा पेपर्स सध्याचा जगभरात टॉप ट्रेडिंग टॉपिक आहे. पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.
11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागले. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.
यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.
पनामा पेपर्समध्ये कोणाकोणाची नावं?
जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement