Pakistan Blast: नमाज सुरु असताना मशिदीत बॉम्बस्फोट; 28 जणांचा मृत्यू, 150 जखमी
Pakistan Bomb Blast : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये (Peshawar) मशिदीत बॉम्बस्फोट झालाय. येथील पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाला.
Pakistan Bomb Blast : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये (Peshawar) मशिदीत बॉम्बस्फोट (Blast in Mosque) झालाय. येथील पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट (Blast in Mosque) झाल्याचं वृत्त आहे. या बॉम्बस्फोटात 28 जणांचा मृत्यू झाला आहे तर 150 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलीस आणि तपास यंत्रणा पोहचल्या असून तपास सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. पण या बॉम्बस्फोटात मोठं नुकसान झाल्याचं वृ्त्त आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाल्यानंतर मशिदीचं छत कोसळलं आहे. नमाज सुरु असताना हल्लेखोरानं बॉम्बनं स्वत:ला उडवलं. या हल्ल्यातील मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डॉनच्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोटामुळे मशिदीचा बराचसा भाग कोसळला आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक भाविक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मृतामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
پشاور سول لائنز کی مسجد میں خودکش دھماکہ انتہائی قابل مذمت ہے۔ اب تک تیس افراد کے زخمی ہونے کی اطلاعات ہیں۔ اللہ تعالی سب کو محفوظ رکھے 🤲🏻 pic.twitter.com/sTQ38B04mY
— Hina Parvez Butt (@hinaparvezbutt) January 30, 2023
#UPDATE | Spokesperson of hospital said that 18 people have been killed in blast and over 90 injured have been brought to facility. More than 30 injured were in critical condition, doctors said: Pakistan's Geo News
— ANI (@ANI) January 30, 2023
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानसुरा, आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मशिदीत नमाज पठण सुरु असताना एका हल्लेखोरानं स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झालाय. तर 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. त्यामुळे मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांना तात्काळ जवळच्या लेडी रीडिंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.