एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय जवानांच्या अन्नात विष मिसळण्याचा पाकिस्तान आणि आयएसआयचा कट, सीआयडीची माहिती
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. सातत्याने सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानी लष्कराच्या प्रत्येक गोळीबाराला भारताकडून चांगलेच प्रत्युत्तर दिले जात आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. सातत्याने सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानी लष्कराच्या प्रत्येक गोळीबाराला भारताकडून चांगलेच प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे हताश झालेले पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय (द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स)अतिशय खालच्या पातळीला गेले आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय भारतीय जवानांच्या रेशनमध्ये (अन्नधान्यामध्ये)विष मिसळण्याचा प्रयत्न करणार आहे. जम्मू काश्मीरच्या सीआयडीने (क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट)याबाबत परिपत्रक जारी करुन अलर्ट जारी केला आहे.
आएसआयचे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर एजंट आहेत. या एजंट्सचा वापर करुन आएसआयने भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा प्लॅन केला आहे. सीआयडीच्या या पत्रानंतर काश्मीरमधील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेशनच्या स्टॉकवर पूर्ण लक्ष देण्यास सांगितले आहे.
VIDEO
14 फेब्रुवारी रोजी 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. 350 किलो स्फोटकांनी भरलेली गाडी दहशतवाद्यांनी जवानांच्या गाडीवर आदळली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अड्डे उध्वस्त केले. भारताने केलेल्या या हल्ल्यात 350 दहशतादी ठार केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement