एक्स्प्लोर
Advertisement
कुलभूषण जाधव यांना काऊन्सलेर अॅक्सेस देण्यास पाकिस्तानचा नकार
इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांना काऊन्सलेर अॅक्सेस देण्यास पाकिस्तानने नकार देऊन भारताच्या प्रयत्नांवर पुन्हा पाणी फेरलं आहे. जाधव यांची भेट पाकिस्ताननं नाकरल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, जाधव यांना वाचवण्यासाठी भारताकडे सर्व कायदेशीर पर्याय खुले असून, या सर्व ठिकाणी आम्ही कडाडून विरोध करु, असं पाक सैन्यानं स्पष्ट केलं.
पाकिस्तान सैन्य दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आशिफ गफूर यांनी सांगितलं की, ''पाकिस्तानी कायद्यानुसार आम्ही जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सेस देऊ शकत नाही. जाधव पाकिस्तानविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी पाकिस्तानी सैन्याची आहे. आम्ही यावर कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही.''
तसेच न्यायालयासमोर जाधव यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी सुरु होती, त्यावेळी त्यांना सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करु दिल्याचा दावाही गफूर यांनी केला आहे. ''न्यायालयासमोर जाधव यांच्याविरोधात जे पुरावे सादर केले, ते कोणत्याही पटलावर खोटे ठरवता येऊ शकत नाहीत.'' असंही गफूर यांनी स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे, जाधव यांना वाचवण्यासाठी भारतीय नागरिक सैन्य दलाच्या अपीलीय न्यायालायत दाद मागू शकतात. तिथंही विरोधात निकाल लागल्यास, सैन्य प्रमुखाकडे दाद मागू शकतात. शिवाय सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती आदींकडेही अपील करु शकतात. पण पाक सैन्याच्या वतीने यासर्व ठिकाणी विरोध करण्यात येईल, असं गफूर यांनी सांगितलं.
दरम्यान, काल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही कुलभूषण जाधव यांना काऊन्सलेर अॅक्सेस मिळावा, अशी मागणी केली होती. तसेच त्यांना देण्यात आलेल्या यातनांमध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या
कुलभूषण जाधवप्रकरणी काऊन्सेलर अॅक्सेस मिळावा : उज्ज्वल निकम
कुलभूषण जाधव यांच्याकडे दोन पासपोर्ट : पाकिस्तान
कुलभूषण यांचं वकिलपत्र घेऊ नका, लाहोर वकिल संघाचा फतवा
कुलभूषण यांच्याकडे फाशीविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस : पाकिस्तान
कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली
56 इंचाच्या छातीचं शौर्य दाखवण्याची हीच खरी वेळ : अशोक चव्हाण
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक
कुलभूषण जाधव यांच्या मित्राशी बातचीत
कुलभूषण जाधवविरोधात निर्णायक पुरावे नाहीत, पाकची कबुली
कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स
हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?
हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement