एक्स्प्लोर
काश्मीरवर तोडगा निघेपर्यंत भारताशी समेट अशक्य : शरीफ

न्यूयॉर्क : काश्मीरप्रश्नी तोडगा काढल्याशिवाय आता भारताशी समेट अशक्य असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या 71 व्या सत्रात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. या भाषणात त्यांनी भारतावर आरोपांची सरबत्ती केली. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून, काश्मिरी जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बुरहान काश्मीरचा 'युवा नेता' : शरीफ
शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर रेटताना भारतीय सैन्य दलावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दहशतवादी बुरहान वाणीला काश्मीरचा युवा नेता संबोधून, भारतीय सैन्याने त्याची हत्या केल्याचा आरोप केला.
काश्मीरवर तोडगा निघेपर्यंत समेट अशक्य : शरीफ
तसेच जोवर काश्मीर प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत भारत-पाकमध्ये शांततापूर्ण नातं तयार होऊ शकत नाही आणि भारत-पाकिस्तानमध्ये समेटही घडू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन : शरीफ
संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन आपली दुतोंडी भूमिकेचं प्रदर्शन जगाला दाखवताना, दहशतवादाविरोधात लढण्यात पाकिस्तान सर्वाधिक कर्यरत असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे भारतीय सैन्य काश्मीरमध्ये मानवी हक्काची पायमल्ली करत असल्याची गरळही त्यांनी ओकली. शिवाय, काश्मीरमधून कर्फ्यू हटवण्याची मागणी करत, काश्मीरमधील प्रत्येक हत्येची संयुक्त चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
"पाक आण्विक संपन्न असूनही..."
यावेळी त्यांनी अण्विक संपन्नतेची आठवण करुन देत, युद्धसंबंधीची खुमखुमी बोलून दाखवली. ते यावेळी म्हणाले की, ''आम्ही आण्विक संपन्न देश असूनही यासंदर्भातील सर्व संधींचा आणि करारांचे पालन करतो.''
"काश्मीरसाठी जनमत घ्या"
यावेळी त्यांनी काश्मीरसाठी जनमत संग्रह घेण्याची मागणी करत, काश्मीरला स्वतंत्र करणार असल्याचंही बोलून दाखवलं.
"पाकिस्तानही दहशतवादाविरोधी लढ्यात सहभागी"
एकीकडे उरीमधील दहशतवादी हल्ल्यावर बोलणं टाळत दुसरीकडे मात्र दहशतवादाविरोधातील लढ्यात स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आहे. जगभरात सुरु असलेल्या दहशतवादविरोधी लढ्यात इतर देशांच्या सोबत पाकिस्तानही आहे. यासाठी जर्ब-ए-अज्म मोहीम देशात राबवली असल्याचे ते म्हणाले.
"पाकिस्तान दहशतवादाचा बळी"
पाकिस्तानही दहशतवादाचा बळी ठरल्याचे सांगण्यास शरीफ विसरले नाहीत. दहशतवादामुळे पाकिस्तानमधील हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे ते यावेळी म्हणाले.
नवाज शरीफ यांच्या यूएनमधील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- परदेशी शक्तींना पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करु देणार नाही - नवाज शरीफ
- भारताकडून काश्मिरी जनतेवर अत्याचार - नवाज शरीफ
- काश्मीर प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत भारत-पाकमध्ये शांततापूर्ण नातं तयार होऊ शकत नाही - नवाज शरीफ
- काश्मीरमधून सैन्याला हटवण्यात यावं - नवाज शरीफ
- दहशतवादाने आतापर्यंत हजारो लोकांचा जीव घेतला - नवाज शरीफ
- पाकिस्तान दहशतवादाचा बळी - नवाज शरीफ
- भारताकडून पाकिस्तानला शांतता हवी - नवाज शरीफ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
