एक्स्प्लोर
छोटू गँगमुळे पाक सैन्याच्या नाकी नऊ, 2 हजार जवान टोळक्याच्या शोधात

इस्लामाबाद : गँगस्टर्सच्या एका टोळीने पाकिस्तानी सैन्याच्या नाकी नऊ आणले आहेत. राजनपूर गँगस्टर्स म्हणजेच छोटू गँग नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सशस्त्र टोळीला जेरबंद करण्यासाठी दोन हजार पाकिस्तानी जवान तैनात करण्यात आले आहेत. पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या 10 किमी परिसरातील एका बेटावर या गँगने 24 पोलिसांनाच ओलिस ठेवल्याची माहिती आहे. छोटू गँगकडे मोठा शस्त्रसाठा असल्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील दोन हजार जवानांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात आलं आहे. सोमवारी सैन्यातील जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बेटावर उतरवण्यात आलं. दुपारी दोन वाजता छोटू गँगला शरण येण्यास सांगितलं गेलं, मात्र त्यांनी दाद न दिल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरु ठेवण्यात आलं. यात 6 पोलिस शहीद झाले आहेत. छोटू गँगमध्ये नेमके किती जण आहेत, याची माहिती पोलिसांकडेही नाही. मात्र हे सर्च ऑपरेशन दोन आठवडे चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छोटू गँगवर हत्या, अपहरण, लूटमार यासारखे शेकडो गुन्हे दाखल आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























