एक्स्प्लोर

Greece Ship Capsized : ग्रीसच्या समुद्रात प्रवासी जहाज बुडाले, 79 लोकांचा मृत्यू तर काही जण अजूनही बेपत्ता

Greece Ship Capsized: अनेक लोकं समुद्रमार्गाने तुर्कीमधून इटलीला जाण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये अनेकदा जहाज बुडाल्याच्या घटना घडतात आणि यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील होतो.

Greece Ship Capsized : युरोपातील ग्रीस (Greece) या देशातील समुद्रात बुधवारी (14 जून) रोजी प्रवासी जहाज बुडाल्याने 79 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. परंतु या दुर्घटनेमध्ये जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेला मागील काही काळामधील सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक जण बेपत्ता असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

हे जहाज बुडाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. एका युरोपीय बचाव पथकाच्या माहितीनुसार, या जहाजामध्ये जवळपास 750 प्रवासी प्रवास करत होते. परंतु या जहाजामध्ये एकूण किती प्रवासी होते याबाबत अजूनही खात्रीपूर्वक माहिती समोर आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून देखील या संदर्भात फक्त अंदाज वर्तवण्यात येत आहेत.  तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 104 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. हे जहाज लिबियामधून रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे. 

लष्कर आणि नौदलाचे जवान घटनास्थळी

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजामधील अनेक प्रवासी हे इजिप्त, सीरिया आणि पाकिस्तानातले होते. हे प्रवासी जहाज दक्षिण ग्रीसमधील कोस्टल टाऊन पाइलोसपासून जवळपास 80 किमी अंतरावर बुडाले. जहाज बुडाल्यानंतर तटरक्षक दल, तसेच नौदलाचे एक जहाज, लष्कराचे एक विमान यांच्या साहाय्याने मदत केली जात आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी काळोखामुळे बचाव कार्य थांबबावे लागले. परंतु गुरुवारी सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच या बचावकार्यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांना वाचवण्यात यश आल्याचं प्रशासानाकडून सांगण्यात येत आहे. 

या दुर्घटनेमध्ये सुखरुप वाचवलेल्या लोकांना पाइलोस जवळील कलामाता या ग्रीक बंदरावर नेण्यात येत आहे. येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच या घटनेमध्ये मृत झालेल्यांची ओळख देखील पटवण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे ग्रीसमध्ये तीन दिवसांसाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच या घटनेला इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अशाच प्रकारच्या दुर्घटनेमध्ये 96 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. परंतु हे जहाज कशामुळे बुडाले याचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचालींकडे आता देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

India May Lose Millionaires This Year: भारत 6,500 कोट्यधीशांना गमावणार? देश सोडून सिंगापूर, दुबईत स्थायिक होण्याकडे श्रीमंतांचा कल, अहवालातून स्पष्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget