एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचं ‘नोबेल’
नोबेलच्या रकमेतील निम्मी रक्कम रेनर वेईस यांना, तर निम्मी रक्कम किप थोर्न आणि बॅरी बॅरिश या दोघांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
स्वीडन : गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना भौतिकशास्त्राचे नोबेल आज जाहीर करण्यात आले. रेनर वेईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार देण्याचे नोबेल समितीने जाहीर केले. पदार्थविज्ञानाचे हे 111 वे नोबेल आहे.
नोबेलच्या रकमेतील निम्मी रक्कम रेनर वेईस यांना, तर निम्मी रक्कम किप थोर्न आणि बॅरी बॅरिश या दोघांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
गुरुत्वाकर्षणाच्याही लहरी असतात, या आइनस्टाइनने वर्तवलेल्या शक्यतेवर गेल्या वर्षी शिक्कामोर्तब झाले. गेली अनेक वर्षे सर्व जगभरामध्ये गुरुत्वीय लहरींच्या शोधाच्या दिशेने प्रयत्न चालविले होते. त्याला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत लिगो (लिगो म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरीज) प्रकल्पामध्ये यश मिळाले.
विश्वाची निर्मिती आणि सुरुवात तसेच इतर अनेक शोधांची वाट या यशामुळे मोकळी झाली आणि जगभर विज्ञानप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली. आता नोबेल मिळाल्यामुळे या आनंदामध्ये भरच पडली आहे.
गुरुत्वीय लहरींच्या भारतात सुरु असणाऱ्या संशोधनामध्ये आणि निरिक्षणामध्ये आयुकाच्या संजीव धुरंधर यांचा वाटा मोठा आहे. धुरंधर हे 1987 पासून यावर काम करत आहेत, 1989 मध्ये त्यांनी आयुकामध्ये काम सुरु केले. गोंगाटासारख्या आवजामधून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या तरंगांचे संकेत शोधणे हे त्यांचे मुख्य कार्य होते.
रेनर वेईस – यांचा जन्म 1932 साली जर्मनीतील बर्लिनमध्ये झाला. मँसेच्युसेट्स इन्स्टिट्युट्स ऑफ टेक्नोलॉजीमधून 1962 साली त्यांनी पीएचडी केली. याच इन्स्टिट्युट्समध्ये ते प्राध्यापकही होते.
बॅरी बॅरिश – यांचा जन्म 1936 साली अमेरिकेतील ओमाहामध्ये झाला. 1962 साली त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून पीएचडी केली.
किप थोर्न - यांचा जन्म 1940 साली लोगान (अमेरिका) येथे झाला. 1965 साली त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी केली. पुढे कॅलिफोर्निया विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
Advertisement