New Zealand Earthquake : न्यूझीलंड हादरलं! 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
New Zealand Earthquake : न्यूझीलंडमध्येही भूकंपाचा झटका बसला आहे. 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झटका बसला आहे.
New Zealand Earthquake : तुर्की आणि सीरियानंतर आता न्यूझीलंड हादरलं आहे. न्यूझीलंडमध्येही (New Zealand) भूकंपाचा झटका (Earthquake) बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल मापण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या वायव्येकडील शहर लोअर हट (Lower Hutt) येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.
न्यूझीलंडमध्ये स्थानिक वेळेनुसार, बुधवारी संध्याकाळी 7:38 (NZDT) वाजेच्या सुमारास6.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप पारापरामुच्या वायव्येस 50 किमी अंतरावर आल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र 57.4 किलोमीटर खोल होते. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale occurs 78km northwest of Lower Hutt in New Zealand: EMSC pic.twitter.com/R9Tk18vEFu
— ANI (@ANI) February 15, 2023
युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरने (EMSC) दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडमधील लोअर हटपासून अंदाजे 78 किमी अंतरावर भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती दिली आहे.
'या' भागात जाणवले भूकंपाचे धक्के
दरम्यान, न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे झटके पॅरापरामु (Paraparaumu), लेविन (Levin), पोरिरुआ (Porirua), फ्रेंच पास (French Pass), अप्पर हट (Upper Hutt), लोअर हट (Lower Hutt), वेलिंग्टन (Wellington), वांगानुई (Whanganui), वेव्हरले (Waverley), पामरस्टन नॉर्थ (Palmerston North), फील्डिंग (Feilding), पिक्टन (Picton), एकेताहुना (Eketahuna), मास्टरटन (Masterton), मार्टिनबरो (Martinborough), हंटरविले (Hunterville), हावेरा (Hawera), ब्लेनहाइम (Blenheim), सेडन (Seddon), नेल्सन (Nelson), डॅनिव्हिरके (Dannevirke), पोंगारोआ (Pongaroa), स्ट्रॅटफोर्ड (Stratford), ओपुनाके (Opunake), तैहापे (Taihape), कॅसलपॉईंट (Castlepoint), मोटुएका (Motueka), ओहाकुने (Ohakune) आणि आसपासचे परिसर या भागात भूकंपाचा धक्का जाणवला.
तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू
तुर्कीमध्ये (Turkiye) सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या विनाशकारी भूकंपामध्ये आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेनं माहिती दिली आहे. दरम्यान, मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :