एक्स्प्लोर

Nepal Presidential Election: नेपाळमध्ये आज राष्ट्रपती निवडणूक; संध्याकाळी चार वाजता मतमोजणी,तर सात वाजता निकाल

Nepal Presidential Election: नेपाळच्या विद्यमान राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपत आहे. अशातच आज नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक घेतली जात आहे.

Nepal Presidential Election: नेपाळमध्ये (Nepal) राष्ट्रपतीपदासाठी (President) आज म्हणजेच, गुरुवारी (9 मार्च) निवडणूक होणार आहे. नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल आणि सीपीएएन-यूएमएलचे ( CPAN-UML) सुभाष चंद्र नेमबांग हे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं नेपाळच्या निवडणूक आयोगानं बुधवारी (8 मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या (Presidential Election) निवडणुकीत प्रतिनिधी सभागृहाच्या दोन माजी वक्त्यांमध्ये लढत आहे. रामचंद्र पौडेल (78) हे आठ पक्षीय आघाडी समर्थित राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत, तर सुभाष नेमबांग (69) यांना सीपीएएन-यूएमएलकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. 

7 वाजेपर्यंत निकाल

नेपाळच्या विद्यमान राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपत आहे. येथील संसद भवनात सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आयोगातर्फे दुपारी 4 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 7 वाजता निकाल जाहीर होणार आहे. एएनआयशी (ANI) बोलताना नेपाळचे निवडणूक अधिकारी महेश शर्मा पौडेल म्हणाले की, "नवीन बानेश्वर येथील संसद भवनातील ल्होत्से हॉलमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व तांत्रिक, मानव संसाधन आणि इतर व्यवस्थापकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे."

कशी होणार नव्या राष्ट्रपतींची निवड? 

देशात एकूण 884 सदस्य इलेक्टोरल कॉलेज (Electoral College) चे आहेत. ज्यामध्ये प्रतिनिधी सभागृहाचे 275 सदस्य, राष्ट्रीय असेंब्लीचे 59 सदस्य आणि सात प्रांतीय असेंब्लीचे 550 सदस्य आहेत. याचाच अर्थ, फेडरल संसदीय आणि प्रांतीय असेंब्लीमध्ये रिक्त जागा नसल्यास, इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण 52,786 वोट शेअर असेल. दुसरीकडे, अध्यक्षपद मिळवण्यासाठी उमेदवाराला एकूण मतांपैकी बहुमत मिळणं आवश्यक आहे.

नेपाळची राजेशाही निवडणुकीपासून दूर

फेडरल संसदेच्या आमदाराच्या एका मताचं वेटेज 79 आहे आणि प्रांतीय असेंब्लीच्या सदस्याच्या मताचं वेटेज 48 आहे. नेपाळमधील राजसत्ता समर्थक पक्ष मतदानापासून दूर राहणार आहे. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष (RPP) जो राजशाही समर्थक उदाहरणांसाठी ओळखला जातो. त्यांनी गुरुवारच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आजच्या मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरपीपीचे प्रवक्ते मोहन श्रेष्ठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कार्यकारिणीनं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Abhay Patil Akola Lok Sabha Election Phase 2 :...तर मग मी विजयी; अभय पाटलांच्या मतदानाचा रंजक किस्साAmravati  Loksabha 2024 : अमरावतीमध्ये वऱ्हाड  पोहचलं मतदानाला : ABP MajhaHingoli Loksabha 2024 : हिंगोलीत लोकसभेच्या मतदानाला सुरुवात, मतदारांनी लावल्या रांगा : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Horoscope Today 26 April 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
Embed widget