नासा मंगळावरील माती पृथ्वीवर आणणार, नासाच्या मोहिमेवर किती खर्च येणार?
नासा तीन मोहिमेदरम्यान मंगळावरुन 2 पाऊंड (सुमारे एक किलो) माती आणणार आहे. मंगळावरील प्राचीन जीवनाच्या खुणा शोधण्यासाठी नासा ही माती पृथ्वीवर आणणार आहे.

NASA Mars Mission :अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) जगातील सर्वात महागडी वस्तू पृथ्वीवर आणणार आहे. नासा मंगळावर गोळा केलेली धूळ आणि माती पृथ्वीवर आणणार आहे. जर तसे झाले तर हा जगातील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा पदार्थ असेल. ही माती पृथ्वीवर आणल्यानंतर त्याद्वारे बरेच संशोधन केले जाईल. नासा तीन मोहिमेदरम्यान मंगळावरुन 2 पाऊंड (सुमारे एक किलो) माती आणणार आहे. मंगळावरील प्राचीन जीवनाच्या खुणा शोधण्यासाठी नासा ही माती पृथ्वीवर आणणार आहे.
तीन मोहिमांसाठी मोठा खर्च होणार
- नासाच्या एकत्रितपणे तीन मोहिमांसाठी एकूण 9 बिलियन डॉलर्स खर्च होतील.
- वेगळ्या अर्थाने समजून घ्यायचं तर मंगळावरुन दोन पाऊंड माती म्हणजेच एक किलो माती आणण्यासाठी एक किलो सोन्याच्या किंमतीपेक्षा सुमारे दोन लाख पट अधिक पैसा खर्च होणार आहे.
- मंगळावरील माती पृथ्वीवर आली तर ती वैज्ञानिकांसाठी एक मोठी उपलब्धी ठरेल. कारण आतापर्यंत मंगळावर उपस्थित रोव्हरद्वारे पृष्ठभागाची माहिती गोळा केली जात आहे.
नासा तीन मोहिमांमध्ये काय करणार?
- नासाची पहिली मोहीम मंगळावरील मातीचे नमुने तपासून एकत्रित करेल.
- दुसरी मोहीम नमुने गोळा करेल आणि ते मंगळाच्या कक्षेत लॉन्च करण्यासाठी आणि लॉन्चरमध्ये पॅक करेल.
- तिसऱ्या मोहिमेत मंगळावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत.
- जुलै 2020 मध्ये पर्सिरव्हन्स रोव्हर म्हणून पहिले मिशन सुरू करण्यात आले.
- फेब्रुवारी 2021 मध्ये या रोव्हरने मंगळ ग्रहावर लँडिंग केले.
नासाच्या म्हणण्यानुसार पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल. परंतु हे पृथ्वीवर परत आणण्यास सुमारे एक दशक लागू शकेल.























