एक्स्प्लोर

NASA Perseverance Rover Landing Video: नासाचं पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावर लँड, पाहा व्हिडीओ

पर्सेव्हरन्स रोव्हरवर वेगवेगळे एकूण 25 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांनी मंगळ ग्रहावरील विविध फोटो कैद केले आहे.

Mars Landing: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने (NASA) मंगळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. नासाच्या पर्सेव्हरन्स रोव्हरने हा व्हिडीओ मंगळ ग्रहावरुन पाठवला आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावर कसं उतरलं याची प्रत्येक सेकंदाची हालचाल या व्हिडीओत दिसत आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावरील लाल जमिनीवरचं लँडिंगचा क्षण नासाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर सात महिन्यांनंतर 19 फेब्रुवारी रोजी मंगळावर यशस्वीरित्या लँड झालं आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

पर्सेव्हरन्स रोव्हरवर वेगवेगळे एकूण 25 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांनी मंगळ ग्रहावरील विविध फोटो कैद केले आहेत. मंगळावरील भूभागाचा असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. व्हिडिओनुसार मंगळाच्या पृष्ठभाग ओबडधोबड आहे हे दिसून येत आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे देखील दिसत आहेत.

व्हिडीओतील दृष्यांवर नजर टाकल्यास मंगळ ग्रहावर मोठं वाळवंट असल्याचं दिसतंय. पर्सेव्हरन्स रोव्हर जसजसं मंगळाच्या पृष्ठभागाजवळ जात होतं तसं जेटमधून निघणाऱ्या वाऱ्यामुळे पृष्ठभागावरील माती वेगाने उडण्यास सुरुवात झाली. मंगळाच्या पृष्ठभागापासून 20 मीटर उंचीवर असतानाचा हा व्हिडिओ आहे. पृष्ठभागाच्या जवळ पोहोचताच रोव्हरची आठ चाके उघडण्यास सुरुवात होते आणि काही सेकंदात रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं.

View this post on Instagram
 
A post shared by NASA (@nasa)

नासाची 'मंगळ'वारी; Perseverance Rover ची यशस्वी लँडिंग!

पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावर काय शोध घेणार?

पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही तीन अब्ज वर्षापूर्वी जीवसृष्टी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असते. त्याचाच अभ्यास करण्यासाठी नासाने पर्सेव्हरन्स मार्स रोव्हर मंगळावर पाठवले आहे. हे रोव्हर मंगळावरील मातीचे सॅम्पल तसेच इतर अवशेष घेऊन पृथ्वीवर येणार आहे. हे अभियान दोन वर्षे चालणार असंही सांगण्यात येतंय.

नासाच्या इंजिनीअर्सनी पहिल्यांदा पर्सेव्हरन्स रोव्हरने पाठवलेला मंगळ ग्रहावरील आवाज ऐकला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की हा 10 सेकंदाचा ऑडिओ मंगळावरील हवेच्या आवाजाचा आहे. पर्सिवियरेंस रोव्हरवरील मायक्रोफोनने हा आवाज कॅप्चर केला आणि आम्हाला पाठवला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?

व्हिडीओ

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, कराडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
Embed widget