एक्स्प्लोर
मुंबईतील गँगस्टर मौलाना खुर्शीद आलमची नेपालमध्ये हत्या
भारतीय सुरक्षा यंत्रणा 1996 पासूनच नेपाळ सरकारला आलमला अटक करुन भारताला सोपवण्याची मागणी करत होत्या.
काठमांडू : मुंबईतील गँगस्टर मौलाना खुर्शीद आलमची नेपाळमध्ये हत्या करण्यात आली. नेपाळच्या आग्नेय भागातील सुनसरी जिल्ह्याच्या रामनगर भुटहामध्ये भरदिवसा त्याची गोळ्या झाडून हत्या केली. विनानंबर प्लेटच्या मोटरसायकलवरुन आलेल्या शार्प शूटर्सनी आलमवर गोळ्या झाडल्या.
रामनगर भुटहामध्ये एका खासगी शाळेचा संचालक असलेल्या आलमवर इंडियन मुजाहिद्दीनच्या चार मोस्ट वॉण्टेड गुन्हेगारांना आश्रय देणं, त्यांना नेपाळी नागरिकत्वाचं प्रमाणपत्र आणि नेपाळी पासपोर्ट बनवण्यासाठी मदत करण्याचा आरोप आहे. या चार अतिरेक्यांनी वाराणसी, गोरखपूर, अहमदाबाद, फैजाबाद, दिल्ली, लखनऊ इथे स्फोट घडवले होते. आलमने त्यांना आश्रयच नाही तर आपल्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीही दिली होती.
मौलाना खुर्शीद आलम हा नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सदस्य होता. भारतीय सुरक्षा यंत्रणा 1996 पासूनच नेपाळ सरकारला आलमला अटक करुन भारताला सोपवण्याची मागणी करत होत्या. इंडियन मुजाहिद्दीनसाठी काम केल्याने 2009 पासून भारताने त्याला मोस्ट वॉण्टेड यादीत ठेवलं होतं. मार्च 2015 मध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आलमविरोधात अनेक पुरावे देऊनही राजकीय संरक्षण असल्याने नेपाळ सरकार कायमच त्याचं प्रत्यार्पण टाळत होतं.
मौलाना खुर्शीद आलम हा इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी भर्तीचं काम करत होताच, पण त्यांना शारजाह मार्गे पाकिस्तानला पाठवण्यासाठीही मदत करायचा. आलमचा भूतकाळ आणि संशयित कारवायांमुळेच त्याची हत्या झाल्याचं नेपाळच्या उच्च अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement