Noma Restaurant : जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट होणार बंद, जेवणासाठी वर्षभर आधीच करावे लागते बुकिंग
Noma Restaurant : जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट 2024 मध्ये बंद होणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी वर्षभर आधीच बुकिंग करावे लागते. या रेस्टॉरंटने अनेक वेळा याला जगातील टॉप रेस्टॉरंटचा खिताब मिळाला आहे
Noma Restaurant : जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट 2024 मध्ये बंद होणार आहे. डेन्मार्कमधील हे नोमा रेस्टॉरंट असून त्याची स्थापना 2003 मध्ये झाली होती. त्यानंतर अनेक वेळा याला जगातील टॉप रेस्टॉरंटचा खिताब मिळाला आहे. हे रेस्टॉरंट वातावरणानुसार उघडे आणि बंद होते. या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जागा मिळणे खूप अवघड असते. कारण येथे जेवणासाठी नेहमीच मोठी गर्दी असते आणि सीट वर्षानुवर्षे आधीच बुक केलेल्या असतात.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोमा रेस्टॉरंट कायमचे बंद होत नाहीये. त्याऐवजी, ते डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये त्याच्या नवीन स्वरूपात पुन्हा सुरू होत आहे. नोमा रेस्टॉरंटचे सह-मालक आणि प्रसिद्ध शेफ रेने रेडझेपी यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, "बाजारात टिकून राहण्यासाठी आम्हाला रेस्टॉरंटमध्ये बदल करावे लागतील. तुम्हाला माहिती आहेच की, नोमा बंद होत आहे कारण आम्ही त्याला नव्या रूपात आणत आहेत. त्यामुळे लवकरच Noma 3.0 सुरू होत आहेत." अशी माहिती रेडझेपी यांनी दिली आहे.
Noma Restaurant : 2024 मध्ये शेवटचे सीट बुकिंग
मिळालेल्या माहितीनुसार, नोमा रेस्टॉरंट दोन दशकांपासून नॉर्डिक फूड तयार आणि सर्व्ह करत आहे. अशा प्रकारे नोमामध्ये जेवणासाठी शेवटच्या सीटचे बुकिंग 2024 च्या हिवाळ्यातील केले आहे. हे प्रसिद्ध रेस्टॉरंट त्याच्या स्वयंपाकघरातील नवनवीन शोध आणि नवीन फ्लेवर्स देत असलेल्या खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते.
Noma Restaurant : नोमाला बदलण्याची गरज
द इंडिपेंडंटमधील एका अहवालात असे म्हटले आहे की, जगप्रसिद्ध रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय शेफ रेडझेपी यांनी घेतला होता. उत्तम जेवणाचा उद्योग दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी हे बदलणे आवश्यक आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. "आम्हाला उद्योगाचा पूर्णपणे पुनर्विचार करावा लागेल. हे खूप कठीण आहे आणि आम्हाला वेगळ्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील, असे रेडझेपी यांनी म्हटले आहे.
Noma Restaurant : यापूर्वी एकदा बंद झाले होते नोमा रेस्टॉरंट
यापूर्वी 2016 मध्ये नोमा रेस्टॉरंट री-ब्रँडिंगसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते दोन वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये पुन्हा सुरू झाले होते. री-ब्रँडिंगनंतर नोमा नव्या अवतारात आले आहे. आता 6 वर्षांनंतर हे रेस्टॉरंट पुन्हा एकदा नव्या रूपात येण्यासाठी बंद करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
मंदीचा फटका! गोल्डमन सॅच कंपनी 3,200 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत