एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंदमान-निकोबारमध्ये अडकलेल्या सर्व 2,376 प्रवाशांची सुखरुप सुटका
पोर्टब्लेअर: चक्रीवादळामुळं अंदमान इथं अडकून पडलेल्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. २,३७६ प्रवाशी गेल्या काही दिवसांपासून अडकून पडले होते. ज्यात महाराष्ट्रातल्याही 50 हून अधिक लोकांचा समावेश होता.
पोर्टब्लेअरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या नील बेटावर 5 डिसेंबरला अचानक पाऊस आणि वादळ सुरु झालं होतं. ज्यामुळे हवाई आणि जलवाहूतक थांबवण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी हवामानात थोडा बदल झाल्यानंतर नौदल, तटरक्षक दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी सर्व पर्यटकांची सुटका केली. एमआय 17 व्ही-5 मिलिटरी ट्रांसपोर्ट हेलिकॉप्टर, तीन पवन हंस हेलिकॉप्टर आणि नौदलाच्या सात नौवकांनी पर्यटकांची सुटका केली. सर्व पर्यटकांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला.Visuals of rescue operations by IAF Mi17 V5 to evacuate stranded tourists at Havelock Island in Andamans #Cyclone pic.twitter.com/UXMHIRPonh
— ANI (@ANI_news) December 9, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement